​ ‘ओढ’ मध्ये भारत-शशिकांतची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 09:22 IST2018-01-15T03:52:14+5:302018-01-15T09:22:14+5:30

सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना मैत्रीची आगळीवेगळी गोष्ट पाहायला मिळणार आहे. मराठीतील आघाडीच्या ...

Indo-Shashikant jugalbandi in 'Swadh' | ​ ‘ओढ’ मध्ये भारत-शशिकांतची जुगलबंदी

​ ‘ओढ’ मध्ये भारत-शशिकांतची जुगलबंदी

नाली एन्टरटेन्मेंट हाऊसची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना मैत्रीची आगळीवेगळी गोष्ट पाहायला मिळणार आहे. मराठीतील आघाडीच्या कलाकारांनी ‘ओढ’च्या कथेत विविध व्यक्तिरेखांद्वारे रंग भरले आहेत. यापैकी भारत गणेशपुरे आणि शशिकांत केरकर यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांची जणू जुगलबंदीच ‘ओढ’मध्ये रंगली आहे.  नागेश दरक आणि एस. आर तोवर यांनी ‘ओढ’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 
शीर्षकावरून जरी ही प्रेमकथा वाटत असली, तरी मूळात या चित्रपटात मैत्रीची कथा पहायला मिळणार आहे. ही कथा यशस्वी करण्यात मुख्य व्यक्तिरेखांसोबत सहाय्यक व्यक्तिरेखांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सध्या विनोदाचा ‘हुकूमी एक्का’ म्हणून ओळखले जाणारे भारत गणेशपुरे यांनी या चित्रपटात एका शिक्षकाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या जोडीला शशिकांत केरकर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका वठवत धमाल केली आहे. या दोघांमधील ‘तू तू मै मै’, ‘रुसवे फुगवे’, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रकारातून प्रेक्षकांना एक अनोखी जुगलबंदीच पहायला मिळणार आहे. 
उपदेशाचे डोस पाजण्याऐवजी एखादा विषय विनोदी शैलीत सादर केला तर तो जनमानसापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतो. याच विचारधारेतून ‘ओढ’ची पटकथा आणि संवादलेखन करण्यात आलं आहे. ‘ओढ’ मध्ये अशा दोन दिग्गज कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी जणू पर्वणी ठरणार आहे.
गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या जोडीला भारत-शशिकांत यांच्यासह मोहन जोशी, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी आदि कलाकार आहेत. दिनेशसिंग ठाकूर यांनी या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखनही केले आहे. छायांकन रविकांत रेड्डी यांनी केले आहे. वेशभूषा-सुनिता घोरावत, कला दिग्दर्शक-आरिफ खान आणि रंगभूषा–प्रदीप दादा, बंधू धुळप ही इतर श्रेयनामावली आहे. १९ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘ओढ’ या चित्रपटाचे चित्रीकरण लातूर, मुंबई, मढ, तळोजा व पनवेल या भागात करण्यात आले आहे.

Web Title: Indo-Shashikant jugalbandi in 'Swadh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.