मोनालिसा बगलच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 14:58 IST2017-09-06T09:28:27+5:302017-09-06T14:58:27+5:30

सिनेमात चमकून एका रात्रीच स्टार झालेले अनेक कलावंत आपल्याला पाहायला मिळतील. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अनेक नवोदित कलाकारांना हे ...

An increase in fan-felling to the side of Monalisa | मोनालिसा बगलच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये वाढ

मोनालिसा बगलच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये वाढ

नेमात चमकून एका रात्रीच स्टार झालेले अनेक कलावंत आपल्याला पाहायला मिळतील. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अनेक नवोदित कलाकारांना हे स्टारडम नवखे नाही. मात्र, मराठीत असे क्वचितच घडते. पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या आगामी सिनेमातील मोनालिसा बागल या नवोदित अभिनेत्रीसोबत असेच काहीसे घडत आहे.  पांडुरंग जाधव दिग्दर्शित आणि लिखित हा सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही, त्याआधीच मोनालिसाच्या चाह्तेवर्गात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमामुळे तिला अनेक चाहत्यांकडून लग्नाची मागणी देखील घातली जात आहे. तिच्या सोशल नेट्वर्किंग साईटवर आणि मोबाईलवर विवाहोत्सुक तरुणांचे अनेक मेसेजेस आपल्याला पाहायला मिळतील. 

आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि संजय पाटील यांची निमिती असलेला हा सिनेमा येत्या नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकतेच या सिनेमाचे 'अशी कशी' आणि  'दारू डिंग डांग' हे गाणे प्रदर्शित झाले असून, ह्या दोन्ही गाण्यातील मोनालिसाचे सौदर्य तिच्या चाहत्यांना घायाळ करून सोडत आहे. शिवाय या सिनेमात ऋत्विक केंद्रेची देखील प्रमुख भूमिका असणार आहे. तरुणाईवर आधारीत असलेल्या या सिनेमाची नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले आहे. ऋत्विक - मोनालिसा या जोडीबरोबरच कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए,अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकारदेखील आपल्याला पहायला मिळणार आहेत.

Web Title: An increase in fan-felling to the side of Monalisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.