बाबो समोरचा गार झाला! 'वाघ आला’, सचित पाटीलची पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:58 PM2022-06-22T15:58:18+5:302022-06-22T15:58:51+5:30

Tamasha Live: सांगितिक नजाराणा घेऊन तमाशा लाईव्ह चित्रपट येत्या १५ जुलैपासून रिलीज होणार आहे.

In front of 'Wagh Aala' from 'Tamasha Live', watch this video | बाबो समोरचा गार झाला! 'वाघ आला’, सचित पाटीलची पोस्ट आली चर्चेत

बाबो समोरचा गार झाला! 'वाघ आला’, सचित पाटीलची पोस्ट आली चर्चेत

googlenewsNext

मराठी चित्रपट आणि मालिकामधील प्रसिद्ध अभिनेता सचित पाटील(Sachit Patil)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. लवकरच तो तमाशा लाईव्ह चित्रपटात झळकणार आहे. सांगितिक नजाराणा घेऊन तमाशा लाईव्ह (Tamasha Live) चित्रपट येत्या १५ जुलैपासून रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपटातील एक जल्लोषमय गाणे झळकले आहे. त्या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून या रॅप साँगमधून सचित पाटीलची ‘अश्विन’ ही भूमिका समोर येत आहे. त्याचा डॅशिंग लूक यात दिसत असून सचितने यात एका वृत्तनिवेदकाची भूमिका साकारली आहे. त्याची सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे,

सचितची ही ओळख आपल्याला सिद्धार्थ जाधव करून देत आहे. या गाण्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे यांनी हे गाणे गायले असून क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर संगीतकार अमितराज आहेत. 'वाघ आला'चे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. सचितने इंस्टाग्रामवर वाघ आला हे गाणे रिलीज झाल्याचे लिहिले की, ह्याच्या नजरेचा हो भाला, थेट काळजावरती घाला, याचा अस्सलाच तिखट तोरा, बाबो समोरचा गार झाला! 'वाघ आला’ 


गाण्याविषयी गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, “चित्रपटात प्रेक्षकांना गाण्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत, त्यातील हे एक गाणं आहे. नवीन प्रयोग करायला नेहमीच मराठी चित्रपटसृष्टी सज्ज असते. गाण्यातून केलेला एक नवा प्रयोग. ही आमची कलाकृती प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.” तर संगीतकार अमितराज म्हणतात, “आम्ही नेहमीच काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येक पात्राला साजेल, असे संगीत आवश्यक असल्याने आम्ही खूप विचार करून संगीत दिले आहे. प्रेक्षकांना आमची कलाकृती नक्कीच आवडेल.”


प्लॅनेट मराठी व माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मित 'तमाशा लाईव्ह'ची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

Web Title: In front of 'Wagh Aala' from 'Tamasha Live', watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.