अभिनेत्री नसते तर सोशल मीडियावर नसते..., जाणून घ्या असं का म्हणतेय 'ज्युलिएट'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 06:22 PM2023-02-07T18:22:11+5:302023-02-07T18:22:33+5:30

वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) लवकच 'जग्गू आणि ज्युलिएट' (Jaggu Aani Juliet) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

If there was no actress, there would be no social media..., know why 'Juliet' says that | अभिनेत्री नसते तर सोशल मीडियावर नसते..., जाणून घ्या असं का म्हणतेय 'ज्युलिएट'

अभिनेत्री नसते तर सोशल मीडियावर नसते..., जाणून घ्या असं का म्हणतेय 'ज्युलिएट'

googlenewsNext

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami). वैदेही लवकच 'जग्गू आणि ज्युलिएट' (Jaggu Aani Juliet) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती अमेय वाघसोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी 'लोकमत'च्या पंचायतमध्ये हजेरी लावली होती. यावेळी वैदेहीने अभिनेत्री नसते तर सोशल मीडियावर नसते, असे म्हटले आहे. 

वैदेही परशुरामी म्हणाली की, व्यक्ती म्हणून मला माझ्या गोष्टी खासगी ठेवायला आवडतात. माझ्या आयुष्यात मी काय करते, म्हणजे मी कुठे हिंडते किंवा खाते हे कुणाशीही शेअर करायचे नसते. ज्याच्याशी शेअर करायचे असते त्यांना मी थेट शेअर करते. मला कोणाच्यात खासगी आयुष्यात रस नाही. मी या क्षेत्रात असल्यामुळे लोकांना आणि आमच्या चाहत्यांना आमच्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. फक्त त्यासाठी मी सोशल मीडियावर आहे आणि या माध्यमातून प्रेक्षकांशी मला संवाद साधता येतो. 


ती पुढे म्हणाली की, जर मी अभिनय क्षेत्रात नसते तर सोशल मीडियाचा वापरही केला नसता. मला सोशल मीडिया वापरण्याचा हेतू समजत नाही. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या चाहत्यांपर्यंत पोहचतो. काही जण कुठल्याही थराला जावून काहीही बोलतो. त्यातून मी शिकले एक तर यात जास्त पडायचं नाही आणि पडलो तर जास्त मनावर घ्यायचं नाही.


कोळीवाड्याचा लाडका जगदीश उर्फ जग्गू आणि अमेरिकेतल्या चितळ्यांची इंग्रजाळलेली जुलिएट यांच्या भन्नाट प्रेमकथेची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. अमेय-वैदेहीसोबतच हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौगुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे. १० फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Web Title: If there was no actress, there would be no social media..., know why 'Juliet' says that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.