शिकारी वृत्तीवर बोट ठेवणारा 'शिकारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 12:28 IST2018-04-10T06:58:33+5:302018-04-10T12:28:33+5:30

‘‘मुलींना जर या ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करायचा असेल तर खुशाल या, पण आंधळेपाने वावरू नका’’असा संदेश देणारा मराठी चित्रपट ...

Hunter-gatherer | शिकारी वृत्तीवर बोट ठेवणारा 'शिकारी'

शिकारी वृत्तीवर बोट ठेवणारा 'शिकारी'

मुलींना जर या ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करायचा असेल तर खुशाल या, पण आंधळेपाने वावरू नका’’असा संदेश देणारा मराठी चित्रपट सृष्टीमधील एका आगळयावेगळया विषयावर आधारित बोल्ड कॉमेडी, मनोरंजनाने भरलेला शिकारी चित्रपट येत्या २० एप्रिलला संपुर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या टीमने नुकतीच लोकमत ऑफिसला भेट दिली आणि 'शिकारी'चे गमक उलगडले. 

        शिकारीचे दिग्दर्शक विजू माने म्हणतात, स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाºया श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन या कथेचे करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट बोल्ड आहेच, कारण फुलाला फुल लावून जो रोमान्स केला जायचा त्याच्या नंतर आता जवळपास चार पिढ्या गेल्या. सध्याच्या परिस्थितीला जवळपास प्रत्येकाच्या हातात एन्ड्रॉईड मोबाईल आहे ज्याच्या माध्यमातून ज्याला जे हवे ते तो पाहू शकतो.       

       ९५ टक्के पुरूष हे शिकारीच असतात. पुरूषांमध्ये असलेल्या शिकारी वृत्ती वर बोट ठेवणारा हा चित्रपट आहे. स्त्रीकडे पाहिल्यावर फक्त स्त्री देह, वासना, हेच मनात येते त्या वृत्तीवर आधारित हा सिनेमा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये या वृत्तीचे शिकारी दबा धरून बसलेले असतात. शिकारी हे त्याचे रूपक आहे. अशाप्रकारचे जे शिकारी आजूबाजूला बसलेले आहेत त्यांच्याविषयी प्रत्येक मुलीने विचार करावा की, आपण एखाद्या व्यक्तीची शिकार तर होत नाही ना?  

          सुव्रत जोशी म्हणाला, माझी इमेज पुर्ण ब्रेक करणारा हा रोल आहे. मी नट म्हणून आतापर्यंत जे करून पाहातो आहे, ते तोडणारी भूमिका माझ्या समोर आली आणि ते आव्हान मी स्वीकारले. कारण, नट म्हणून मला इतरही गोष्टी करता येतात का? हे बघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या गोष्टी करून पाहणे होय. ती संधी मला 'शिकारी'च्या माध्यमातून मिळाली. माझी भूमिका तशी वेगळीच आहे. जी व्यक्तिरेखा मी साकारली आहे त्याविषयी सांगायचे तर, तो शिकारी आहे. फिल्मच्या प्रोडक्शन युनिटमध्ये काम करणारा सहावा सातवा असिस्टंट आहे. जो खुर्चीवर बसून व्हाऊचर्स फाडण्याचे काम करतो. माझी व्यक्तिरेखा गावाकडील मुलाची आहे. तो कोल्हापूरकडील भाषा बोलणारा आहे. ज्याला 'छपरी' म्हटले जाते तसा हा आहे. विनोदी मिश्किल अशा स्वभावातून हळूहळू माणूस कसा गडद होत जातो हे दाखवणारी भूमिका आहे. मी मिरासदारांच्या कथा वाचल्यात व खूप एन्जॉय केल्यात. आणि मला असे वाटते की नव्या पिढीच्या तरूणांनी मजा म्हणून का होईना असे कथानकसुद्धा एकदा चाखून बघावे. 

          दाक्षिणात्य चित्रपटांत झळकलेली नेहा खान सांगते, मला असे वाटते की, कोणत्याही मुलीला हा रोल आॅफर झाला तर ती नाही म्हणूच शकणार नाही.  मराठी लोक बोल्ड बघतात पण ते हिंदीमध्ये. मराठीमध्ये अजून बोल्ड चित्रपट बघितले नाही आहे. सिनेमाविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर  आपण लग्नाला जातो त्याठिकाणी नॉनव्हेज असते आणि व्हेजसुद्धा असते. हा सिनेमाही तसाच आहे. पूर्ण मनोरंजनात्मक, तुम्हाला नॉनव्हेज खायचे असेल तर तुम्ही बोल्ड बघा. व्हेज खायचे असेल तर तुम्ही खळखळून हसा. 

अभिनेता, निमार्ता, दिग्दर्शक असे अष्टपैलू  व्यक्तिमत्त्व महेश मांजरेकर यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या 'शिकारी'  या सिनेमाची निर्मिती विजू माने यांनी केली आहे तर दिग्दर्शन विजय पाटील यांनी केलं आहे.  गाजलेली मराठी मालिका 'दिल दोस्ती दुनियादारी'तून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशी आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नेहा खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. नेहा या चित्रपटातून पदार्पण करत आहे. याव्यतिरिक्त कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहेत.

अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा धांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.

Web Title: Hunter-gatherer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.