डिसेंबरमध्ये गेला उडतची शंभरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 15:08 IST2016-12-22T15:08:47+5:302016-12-22T15:08:47+5:30

सध्या आपल्याकडे नाटकांना देखील चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळतेय. नाटकाला हाऊसफुल्लच्या पाट्या झळकतानाही दिसत आहेत. प्रेक्षक सिनेमांपेक्षा आता नाटकाला ...

The hundredth of the journey was in December | डिसेंबरमध्ये गेला उडतची शंभरी

डिसेंबरमध्ये गेला उडतची शंभरी

्या आपल्याकडे नाटकांना देखील चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळतेय. नाटकाला हाऊसफुल्लच्या पाट्या झळकतानाही दिसत आहेत. प्रेक्षक सिनेमांपेक्षा आता नाटकाला जास्त पसंती देताना दिसतात. त्यामुळेच कि काय आता नाटकांचे देखील शंभर पेक्षा जास्त प्रयोग होत आहेत. सध्या सिदधार्थ जाधव रंगभूमी गाजवत आहे. गेला उडत या नाटकामध्ये सिदधआर्थने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. या नाटकाचे महाराष्ट्रच नाही तर नुकताच गुजरात मध्ये देखील प्रयोग झाला आहे. आता डिसेंबरमध्ये या नाटकाचे शंभर प्रयोग पूर्ण होणार असल्याचे कळतेय. बरेच  कलाकार मालिका, चित्रपट सांभाळून रंगभूमीवर अभिनय करताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर या कलाकारांचे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरताना दिसत आहे.  सिध्दार्थ जाधव याच्या गेला उडत या नाटकाची प्रचंड चर्चा आहे. हे नाटक आता पुणे- मुंबई पुरतेच न राहता या नाटकाचे काही प्रयोग गुजरात राज्यातदेखील झाले आहेत. म्हणतात ना, कलेला भाषेचा अडसर नसतो. नेमकी हेच वाक्य गेला उडत या नाटकाने सिद्ध करून दाखविले आहे. काही दिवसांपूर्वी गेला उडत या नाटकाचे चार प्रयोग गुजरात या राज्यात सादर करण्यात आले होते. या नाटकाला गुजरातमध्येदेखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हे नाटक अहमदाबाद आणि बडोदा येथे सादर करण्यात आले होते. तसेच प्रेक्षकांनी भाषा जरी समजली नसली, तरी हे नाटक आम्हाला आवडले असल्याचे म्हटले आहे. केदार शिंदे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. सिध्दार्थने अनेक मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे.त्याने जत्रा,टाइम प्लीज. प्रियतमा, खोखो, कुटूंब, क्षणभर विश्रांती, माझा नवरा तुझी बायको त्याने मराठी चित्रपटसृष्ट्रीला दिले आहेत. तसेच तो सध्या नाटकांसहित चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असल्याचे कळत आहे. 

Web Title: The hundredth of the journey was in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.