​ शंभर रुपयांची नोट वाटते लाखमोलाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 17:12 IST2016-12-22T14:15:04+5:302016-12-22T17:12:12+5:30

विनोदी  अभिनेते जॉली लिव्हर यांनी नेहमीच प्रेक्षकांना हसविले आहे. हिंदी, मराठी अशा अनेक भाषांमध्ये काम करणारे जॉनी लिव्हर त्यांच्या ...

A hundred rupees note seems to be worth millions | ​ शंभर रुपयांची नोट वाटते लाखमोलाची

​ शंभर रुपयांची नोट वाटते लाखमोलाची

नोदी  अभिनेते जॉली लिव्हर यांनी नेहमीच प्रेक्षकांना हसविले आहे. हिंदी, मराठी अशा अनेक भाषांमध्ये काम करणारे जॉनी लिव्हर त्यांच्या सेन्स आॅफ ह्युमर मुळे ओळखले जातात. नुकताच त्यांच्या या विनोदशैलीचा प्रेक्षकांना अनुभव आला. अभिनेता जॉनी लिव्हर हे १०० रुपयांच्या नोटाचे बंडल पाहत आनंदाने नाचत असलेला एक व्हिडीओ नोटबंदी नंतर सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत जरी, मी १०० रुपयांच्या नोटा बघून नाचत असलो तरी, नोटबंदीनंतर कित्येक दिवस १०० रुपयाची नोटच पाहिली नसून माझेच वांदे झाल्याचा खळबळजनक खुलासा हास्य अभिनेता जॉनी लिव्हर यांनी एका कार्यक्रमात केल्याने नोटबंदीचा फटका जॉनी भाईलाही बसल्याचे स्पष्ट झाले. तरीही त्यांनी नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. इंटरनॅशनल हॉटेल कशीशमध्ये मंगळवारी कैसी थी ओ तेरी बाते या व्हिडीओ अल्बम सीडीच्या शुभारंभासाठी जॉनी लिव्हर आले होते. यावेळी नोटबंदीनंतरच्या काही अडचणी त्यांनी मांडल्या. ७ नोव्हेबर रोजी पंतप्रधान मोदींनी १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला होता. माझाही एक शो १३ नोव्हेंबर रोजी झाला. त्यावेळी प्रेक्षक जुन्या नोटा घेवून शो बघण्यासाठी आले होते. मात्र आयोजकांनी घेण्यास नकार दिला. त्यावेळी मी आयोजकांना सांगितले कि, जुन्या नोटा स्वीकारा. मात्र शो संपल्यावर माझीच सुट्टे पैशे नसल्याने पंचाईत झाली. त्यावेळी आयोजकांना विनंती केली की, मला १०० रुपयाच्या नोटा असलेल्या एक १० हजार रुपयाच्या बंडलची मागणी केली. त्यांनी १०० रुपयाच्या नोटाचे बंडल ज्यावेळी माज्या हातात दिले. त्यावेळी १०० ची प्रत्येक नोट १ लाख रुपयासारखी वाटत होती. हॉटेल, मॉल, पेट्रोलपंप, आदी ठिकाणी कार्डस्वीप करून पेमेंट केले. मात्र घरात भाजीपाला, किरकोळ वस्तू तसेच वेटर, वाहनचालकाना टीप अश्या छोट्या छोट्या बाबतीत अडचणी आल्या आहेत. मीही एटीएम आणि बँकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढले. आता मात्र, बँक बाहेरील गर्दी हळूहळू कमी होत चालली असल्याचा दावा जॉनी लिव्हर यांनी केला असून आमच्या क्षेत्रात तर आधीपासूनच धनादेशने पेमेंट अदा करण्यात येते. त्यामुळे माज्याकडे काळे धन नसल्याने मला भीती नसल्याचे सांगत पंतप्रधान मोदींने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.     

Web Title: A hundred rupees note seems to be worth millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.