उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेला कलावंतांचा प्रचंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:00 IST2016-01-16T01:09:22+5:302016-02-05T14:00:00+5:30

एखाद्या कलाकारातील सुप्त गुणांना तेव्हाच वाव मिळतो जेव्हा त्याच्याकडून एखादी कलाकृती उत्स्फूर्तपणे घडते. याच उत्स्फूर्ततेतून नवे कलाकार, दिग्दर्शक, लेखक ...

A huge response by the artist to the spontaneous solo event | उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेला कलावंतांचा प्रचंड प्रतिसाद

उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेला कलावंतांचा प्रचंड प्रतिसाद

ाद्या कलाकारातील सुप्त गुणांना तेव्हाच वाव मिळतो जेव्हा त्याच्याकडून एखादी कलाकृती उत्स्फूर्तपणे घडते. याच उत्स्फूर्ततेतून नवे कलाकार, दिग्दर्शक, लेखक घडत असतात. मराठी मनोरंजनसृष्टीत नव्या दमाच्या कलाप्रेमी मंडळींना संधी मिळावी व त्यांना योग्य ते मार्गदर्शन लाभावे, यासाठी मानाचि (मालिका, नाटक, चित्रपट) या लेखक संघटनेने याआधी लेखन कार्यशाळा स्पर्धेचे आयोजन केले आहे. कार्यशाळा स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या सहकार्याने यंदाच्या एकांकिका स्पर्धेची दमदार सुरुवात झाली. राकेश सारंग, गंगाराम गवाणकर, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मंगेश तेंडुलकर, अरुण नलावडे, सदानंद मोरे, डॉ. गिरीश ओक, मा. राजन खान, खासदार सुप्रिया सुळे, दीपक राजाध्यक्ष, निर्मिती सावंत, चित्रकार वासुदेव कामत, आशुतोष घोरपडे, किशोर कदम, क्रिकेटपटू संदीप पाटील, संजय सोनवणी या मान्यवरांनी दिलेल्या विषयांवर विविध संस्थांनी एक से बढकर एक एकांकिका सादर केल्या. २७ एकांकिकांच्या विषयांमधून ७ एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत.

Web Title: A huge response by the artist to the spontaneous solo event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.