गडबड झाली पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 17:04 IST2018-06-02T11:34:47+5:302018-06-02T17:04:47+5:30
सिनेमा तयार करणं सोप्प असतं पण, तो सिनेमागृहापर्यंत पोहचवून हिट आणि सुपरहिट करणं वाटतं तेवढं सोप्प अज्जिबात नसतं. त्यात ...
.jpg)
गडबड झाली पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल
स नेमा तयार करणं सोप्प असतं पण, तो सिनेमागृहापर्यंत पोहचवून हिट आणि सुपरहिट करणं वाटतं तेवढं सोप्प अज्जिबात नसतं. त्यात सध्या मराठी सिनेमांना मराठी सिनेमांचीच स्पर्धा असते, कारण एकाचवेळी तीन ते चार सिनेमे आता प्रदर्शित होतात. प्रांजली फिल्म प्रॉडक्शन्स प्रस्तुत डॉ. जितेंद्र राठोड निर्मित, रमेश रोशन सह निर्माते असलेला गडबड झाली सिनेमा कालच प्रदर्शित झाला, पहिल्याच दिवशी या सिनेमाच्या शोजला हाऊसफुल्लचे बोर्ड झळकण्याची संधी मिळाली. सिनेमाचे दिग्दर्शक संतराम असून सिनेमाला रमेश रोशन यांचे संगीत लाभले आहे.
मराठी बिग बॉसमुळे सध्या चर्चेत असलेला मराठी अभिनेता राजेश शृंगारपुरे, नेहा गद्रे, विकास पाटील यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत उषा नाडकर्णी, मोहन जोशी, संजय मोहिते, हर्षा गुप्ते, प्रमोद शिंदे, निरंजन नलावडे, हर्षी शर्मा, प्रतिभा भगत यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्याच दिवशी कोल्हापूर, पुणे, ठाणे, विरार, नाशिक भागातील काही सिनेमागृहात गर्दी आहे तर सलग विरार, पुणे आणि कोल्हापूर येथे पहिल्याच शो ला हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले. वेगळ्या प्रकारचा विनोद या सिनेमातून मराठी प्रेक्षकांना मिळतो आहे.
लग्नाच्या बाबतीत होणारी गडबड या सिनेमाच्या कथेचा मुख्य बाज आहे. लपवाछपवी त्यातून होणारे गैरसमज आणि या सर्व प्रकारातून होणारा गोंधळ म्हणजेच गडबड झाली सिनेमा. अनिल पवार यांचे गमतीशीर संवाद देखील सिनेमाला वेगळी उंची देतात. विकास पाटीलने साकारलेली स्त्री आणि नेहा गद्रेने साकारलेला सरदारजी अधिक धमाल आणतात. या चित्रपटात उषा नाडकणींनी राजेश शृंगापुरेच्या आजीची भूमिका साकारली आहे. मरण्याआधी आजीला त्यांच्या सुनेचं तोंड बघायचं आहे.त्यामुळे तिचे सर्व प्रयत्न सुरू असतात.खरंतर आजीमुळे मला लग्न करावं लागतं. कसंबसं लग्न होतं.. पण लग्नाच्या वेळी अशी काहीतरी गडबड होते की संपूर्ण गोष्टच बदलून जाते.