प्राजक्ता माळीचा हॉट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 18:10 IST2016-12-31T18:10:32+5:302016-12-31T18:10:32+5:30

जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या मालिकेतील सरळ साधा असलेल्या तिच्या लूकने ...

Hot look of Prajakta Mali | प्राजक्ता माळीचा हॉट लूक

प्राजक्ता माळीचा हॉट लूक

ळून येतील रेशीमगाठी या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या मालिकेतील सरळ साधा असलेल्या तिच्या लूकने आणि अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. मात्र या सोज्वळ भूमिकेतील प्राजक्ताचा हा हॉट लूक पाहून तिचे चाहते ही थक्क झाले असतील हे मात्र नक्की. कारण तिचा हॉट लूक सध्या सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा हा फोटो सोशलमीडियावर फिरताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या हॉट लूकलादेखील चाहत्यांनी पसंती दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेने फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तिची या मालिकेतील भूमिका प्रेक्षक आज ही विसरले नाही. तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता ललित प्रभाकरदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळला होता. या दोघांची मालिकेतील ही जोडी खूपच हीट ठरली होती. या जोडी जोडीला पुन्हा एकत्रित पाहाण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक होते. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता लवकरच पूर्ण होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. कारण ही जोडी आता चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटात या दोघांसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील पाहायला मिळणार आहे. प्रवीण कुंटे दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच हंपी येथे करण्यात आले आहे. मध्यंतरी त्यांच्या या आगामी चित्रपटाची चर्चा खूपच रंगली होती. मात्र हा चित्रपटदेखील कधी प्रदर्शित होणार आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाचे नावदेखील अदयाप कळाले नाही. 
   

Web Title: Hot look of Prajakta Mali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.