Exclusive पाहा कोण असणार आहेत या ऐतिहासिक चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 12:26 IST2016-12-08T12:19:49+5:302016-12-08T12:26:19+5:30

 बेनझीर जमादार  सध्या मराठी चित्रपटष्ट्रीत रोमान्स, कॉमेडी, प्रेमकथा, कौटूंबिक आणि ऐतिहासिक अशा विविध विषयांवर चित्रपट येऊ घालत आहे. आता ...

In this historic film, who will be looking at Exclusive | Exclusive पाहा कोण असणार आहेत या ऐतिहासिक चित्रपटात

Exclusive पाहा कोण असणार आहेत या ऐतिहासिक चित्रपटात

 बेनझीर जमादार 


सध्या मराठी चित्रपटष्ट्रीत रोमान्स, कॉमेडी, प्रेमकथा, कौटूंबिक आणि ऐतिहासिक अशा विविध विषयांवर चित्रपट येऊ घालत आहे. आता असाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कारण नुकतेच अभिनेता प्रसाद ओक याने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. चित्रिकरणादरम्यानचा हा फोटो असून खूप धमाल करत असल्याचे त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. या फोटोमध्ये प्रसाद ओक, प्रविण तरडे, आस्ताद काळे, निखिल राऊत आणि अजय पूरकर हे कलाकार दिसत आहेत. त्यांचा हा सेल्फी पाचगणी येथील आहे. हे सर्व कलाकार पाचगणी येथे एका ऐतिहासिक चित्रपटाची चित्रिकरण करत असल्याचे समजत आहे. हे  कलाकार चित्रिकरणा दरम्यान खूपच कल्ला करत आहेत. या चित्रपटात या कलाकारांव्यतिरिक्त महेश मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, नेहा जोशी, चिन्मय मांडलेकर, मृणाल देव-कुलकर्णी अशी तगडी कास्टदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार  आहे. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच एक मोठा ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळणार हे मात्र नक्की. या चित्रपटासाठी कलाकारांनी बरीच मेहनत घेतली असून त्यासाठी प्रशिक्षणदेखील घेतले आहे. त्यामुळे हा एक मोठा प्रोजेक्ट असून या चित्रपटाविषयी थोडीही चुणूक  न लागण्याची खबरदारी संपूर्ण टीम घेत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण अदयापदेखील सुरू आहे. मात्र चित्रपटाचे नाव काय असणार आहे हे पूर्णपणे  गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या कथेवर आधारित असल्याचे कळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या मोठया ऐतिहासिक चित्रपटासाठी वाट पाहावी लागणार आहे हे मात्र नक्की.

Web Title: In this historic film, who will be looking at Exclusive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.