‘मिस अर्थ इंडिया’ठरलेली हेमल इंगळे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 16:38 IST2017-11-29T11:06:35+5:302017-11-29T16:38:41+5:30

सध्या सर्वत्र  'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकणारी मानुषी छिल्लरचा बोलबाला पाहायला मिळतोय. यानंतर ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार का? असे ...

Heml Ingle set to 'Miss Earth India' ready for debut in Marathi cinema | ‘मिस अर्थ इंडिया’ठरलेली हेमल इंगळे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज!

‘मिस अर्थ इंडिया’ठरलेली हेमल इंगळे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज!

्या सर्वत्र  'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकणारी मानुषी छिल्लरचा बोलबाला पाहायला मिळतोय. यानंतर ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार का? असे अनेक प्रश्न तिला विचारले जात आहेत. मुळात सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर तरुणींचा पहिला ओढा असतो तो बॉलिवूड सिनेमाकडे. मात्र अशी एक माजी मिस अर्थ इंडिया आहे जी बॉलिवूड सिनेमा नाहीतर मराठी सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणार आहे. ती सौदर्यवती आहे 'मिस अर्थ इंडिया' हेमल इंगळे. मुळची कोल्हापूरमध्ये वाढलेल्या मराठमोळ्या हेमल इंगळेने पर्यावरण संवर्धनावर आधारित असलेल्या सौंदर्यस्पर्धेत ‘मिस अर्थ इंडिया’ हा प्रतिष्ठित किताब मिळवला. दिल्लीत रंगलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून पाच तर देशभरातून ३५ मुलींनी भाग घेतला होता आणि अंतिम फेरीत हेमल भारताची प्रतिनिधी म्हणून अव्वल ठरली होती. आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असताना आगामी चित्रपट 'आस' मधून हेमल इंगळे झळकणार आहे. या सिनेमा आधी तिला ब-याच सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या.मात्र सिनेमाची कथा हृदयाला भिडेल अशेच सिनेमा कऱणार असल्याचा निर्धार तिने केला होता. अगदी मनाला भावेल अशा सिनेमाची ऑफर आली आणि तिने हा सिनेमा स्विकारला.'आस' असं या मराठी सिनेमाचं नाव आहे.हेमल  इंगळेसह सिनेमात आणखी कोणते चहरे झळकणार याविषयी माहिती देण्यात आली नसली हा सिनेमा कधी रसिकांच्या भेटीला येणार याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकल्यानंतर मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये एंट्री करणार का याविषयी विचारल्या गेलेल्या प्रश्नावर याविषयी विचार केला नसल्याचे म्हटले असून आमिर खान फेव्हरेट अभिनेता असल्याचेही ती सांगायला विसरली नाही. ‘मिस वर्ल्ड’स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य देशांच्या सौंदर्यवतीही मला माझ्या सारख्याच, माझ्यातल्याच वाटल्या. आम्हा अनेकींना एकमेकींची भाषा कळत नव्हती. पण तरिही सर्वजणी परस्परांच्या मदतीसाठी सज्ज असायच्या. अनेकींना मी बॉलिवूड अभिनेत्री आहे, असेच आधी वाटले होते. आमच्यात कुठलाही पूर्वग्रह नव्हता. सर्वजणी अगदी खुल्या मनाने स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, असे मानुषीने सांगितले.

 

Web Title: Heml Ingle set to 'Miss Earth India' ready for debut in Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.