अंपगावर मात करत त्याने तयार केला लघुपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 17:03 IST2016-12-03T17:03:28+5:302016-12-03T17:03:28+5:30
जिद्द , चिकाटी, कष्ट आणि सकारत्मकतेने आयुष्याकडे पाहिल्यास कुठल्याही अडचणीवर मात करता येते. याचे उदाहरण म्हणजे मधुर घोंगरे. मधुरला ...

अंपगावर मात करत त्याने तयार केला लघुपट
ज द्द , चिकाटी, कष्ट आणि सकारत्मकतेने आयुष्याकडे पाहिल्यास कुठल्याही अडचणीवर मात करता येते. याचे उदाहरण म्हणजे मधुर घोंगरे. मधुरला लहानपणीपासूनच अभिनयाची आवड होती मात्र एका अपघातात उजवा हात गमवावा लागल्याने कोणी लघुपट या नाटकांमध्ये काम त्याला देत नव्हते. मात्र त्याने हताश न होता ज्या व्यंगामुळे अनेकांनी नाकारले त्याच व्यंगावर लघुपट करण्याचा विचार मधुरने केला. अखेर त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले. मधुरने तुटता तारा हा लघुपट तयार केला. वयाच्या ९ व्या वर्षी भावडांबरोबर घराच्या छतावर खेळताना हाय व्होलटेजच्या तारेला हात लागल्याने मधुरला त्याचा घोट्यापर्यंतचा उजवा हात गमवावा लागला. घडलेल्या अपघातामुळे आता आपल्या मुलाचं कसं होणार असा प्रश्न त्याच्या पालकांना पडला. त्यातच घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे मधुरच्या भविष्याची चिंता त्याच्या पालकांना सतावू लागली. मधुरने हॉस्पिटलमध्येच डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न सुरु केला. तसेच लहानपणापासूनच अभिनय व कलेची आवड असल्याने मधुरला हे क्षेत्र नेहमीच आकर्षित करत राहिल. त्यामुळे कला क्षेत्रात काम करण्याच्या त्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या मात्र घोट्यापर्यंतचा उजवा हात नसल्याने अनेकांनी त्याला संधी दिली नाही. ज्या व्यंगामुळे त्याला नाकारण्यात आले त्याचा न्युनगंड न बाळगता त्याच व्यंगावर लघुपट करण्याचे त्याने ठरवले. इंटरनेटच्या सहाय्याने लघुपट तयार करण्याचे तंत्र त्याने अवगत केल. मित्रांच्या सहाय्याने त्याने मोबाईलवर चित्रित करुन तुटता तारा हा लघुपट तयार केला. युट्यूबवर अपलोड केलेल्या त्याच्या या लघुपटाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे. खुद्द अभिनेता सिद्धार्थ जाधवनेदेखील त्याचे कौतुक केले.
![]()