सनी लिओनीचा हा मराठमोळा अंदाज तुम्ही पाहिलाय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 11:35 IST2017-05-06T06:05:00+5:302017-05-06T11:35:00+5:30
सध्या चोहीकडे सनीच्या हॉट अदांच्या नाही तर मराठमोळ्या अंदाजाच्या चर्चा रंगल्या आहेत..... नेहमीच या बेबी डॉल सनीच्या सेक्सी अदा ...

सनी लिओनीचा हा मराठमोळा अंदाज तुम्ही पाहिलाय का?
स ्या चोहीकडे सनीच्या हॉट अदांच्या नाही तर मराठमोळ्या अंदाजाच्या चर्चा रंगल्या आहेत..... नेहमीच या बेबी डॉल सनीच्या सेक्सी अदा आणि नख-यांवर सारेच फिदा होतात...तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच असतो..ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी आता मराठी सिनेमात आपल्या अभिनयासह सौंदर्यांची जादू पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे. होय, सनी लिओनी 'बॉईझ्' या मराठी सिनेमातू मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असून ती चक्क मराठी आयटम साँग करताना रूपेरी पडद्यावर थिरणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला तिने सुरुवात केली असून मराठमोळ्या लूकमध्ये सनीचा नवा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सनी लिओनीचा हा मराठमोळा अंदाज सा-यांच्या आकर्षणाचा विषय ठरतोय. सोशल मीडियावर खुद्द सनीने लिओनीनेच तिचा मराठमोळा अंदाजातला फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रीयाही मिळत आहेत. त्यामुळे आता बेबी डॉल सनी लिओनीचा हा मराठमोळा अंदाज रूपेरी पडद्याव काय कमाल करतो हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
![]()
हॉट अदा आणि बॉलिवूड सिनेमात आयटम नंबर करणा-या सनीला काही तरी वेगळं करायचे होते त्यानुसार ब-याच दिवसांपासून सनी मराठी सिनेमात झळकणार अशा चर्चा रंगत होत्या ...मात्र त्यांवर सनीकडून दुजोरा मिळाला नव्हता. आता खुद्द सनी लिओनी मराठी रसिकांच्या भेटीला येणार असल्याच्या बातमीला खुद्द सनीनेच दुजोरा दिला आहे. 'बॉयझ्' हा सिनेमा तरुण पिढीवर आधारित असल्याचे समजते.या आयटम साँगचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले असून, सनीदेखील त्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसून आले. सुनिधी चौहानने गायलेल्या या आयटम गाण्याचे संगीत दिग्दर्शन अवधूत गुप्तेने केले असून, हिंदीचे प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी या गाण्यावर सनीला थिरकवले आहे.