मिताली मयेकर करणार ही सवय बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 17:44 IST2016-12-31T17:44:45+5:302016-12-31T17:44:45+5:30

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. तसेच हे वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जाण्यासाठी काही व्यक्ती नवीन संकल्प करतात. ...

The habit of making Mithali Mayekar off | मिताली मयेकर करणार ही सवय बंद

मिताली मयेकर करणार ही सवय बंद

ीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. तसेच हे वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जाण्यासाठी काही व्यक्ती नवीन संकल्प करतात. तसेच आपल्या काही वाईट सवयींवरदेखील निर्बंध करण्याचा प्ऱयत्न या संकल्पच्या माध्यमातून करत असतात. असाच एक नवीन वर्षाचा संकल्प अभिनेत्री मिताली मयेकर हिने केला आहे. मिताली मयेकर सांगते,  मला नुकत्याच आलेल्या काही अनुभवांवरून मी असं ठरवलंय की मी या पुढे कुठल्याही व्यक्तीला पटकन जज नाही करणार. त्या व्यक्तीबद्दल मला काही पर्सनल एक्सपीरिअन्स आल्यावरच मी त्यांच्या बद्दल माझं मत बनवेन. त्यानंतर त्याच्याशी कशाप्रकारे वागायचा याचा विचार करेन. मिताली ही सध्या फ्रेशर या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तसेच या मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही मालिका तरूणांसाठी खूपच खास ठरत आहे. त्याचप्रमाणे मितालीने मराठी चित्रपट केले आहे. तिने उर्फी नावाचा मराठी चित्रपट केला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रथमेश परबदेखील झळकला होता. त्याचप्रमाणे मितालीने बॉलिवुड चित्रपटदेखील केला आहे. बिल्लू या चित्रपटात ती प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तसेच तू माझा सांगती, उंच माझा झोका, भाग्यलक्ष्मी, असंभव अशा सुपहीट मराठी मालिकादेखील मितालीने केल्या आहे. त्याचप्रमाणे तिने नैनातिक या नाटकाच्या माध्यमातूनदेखील रंगभूमीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. अशा पध्दतीने या अभिनेत्रीने अगदी लहान वयात नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. 

Web Title: The habit of making Mithali Mayekar off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.