लेखकांसाठी खुशखबर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 14:27 IST2016-12-31T14:27:39+5:302016-12-31T14:27:39+5:30
लेखक हा चित्रपटाचा मुख्य घटक असतो. लेखकाच्या लेखणीतून कथा उतरल्याशिवाय चित्रपट पूर्ण होऊच शकत नाही. परंूतू आज याच लेखकांच्या ...
.jpg)
लेखकांसाठी खुशखबर...
ल खक हा चित्रपटाचा मुख्य घटक असतो. लेखकाच्या लेखणीतून कथा उतरल्याशिवाय चित्रपट पूर्ण होऊच शकत नाही. परंूतू आज याच लेखकांच्या कामाची योगय दखल घेतली जात नाही. कोणत्याही निर्मात्याकडून चित्रपटलेखकांची मानधन व श्रेयाच्याबाबतीत फसवणूक होऊ नये, यासाठी लेखकाचे ना हरकत पत्र असल्याशिवाय कोणत्याही मराठी चित्रपटाला अनुदान दिले जाणार नाही, त्या दृष्टीने शासकीय पातळीवरुन नक्की कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री. विनोद तावडे यांनी मानाचि लेखक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. मालिका, नाटक व चित्रपट माध्यमांतील लेखकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र आलेल्या मानाचि लेखक संघटनेच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. तावडे यांची भेट घेऊन लेखकांच्या समस्या मांडल्या. लेखक हा चित्रपटाचा मुलभूत घटक असूनही चित्रपट लिहून पूर्ण झाल्यानंतर अनेक वेळा निर्मात्याकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि मानधन व श्रेय याबाबतही टाळाटाळ केली जाते, याकडे शिष्टमंडळाने श्री. तावडे यांचे लक्ष वेधले. ही फसवणूक टाळण्यासाठी निर्मात्यांना लेखकाचे ना हरकत पत्र अपरिहार्य करावे व त्याशिवाय त्या चित्रपटाचा अनुदानासाठीही विचार करण्यात येऊ नये, तसेच लेखकाच्या ना हरकत पत्राशिवाय चित्रपट सेन्सॉरसंमत न होण्याच्या दृष्टीनेही केंद्रीय स्तरावर शासनाच्या वतीने शिफारस करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. लेखकांना त्यांच्या कामाचे योग्य पैसे दिले जात नसल्याचे देखील अभिनेता हेमंत ढामेने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले होते. आता सांस्कृतिक मंत्र्यांनी लेखकांसाठी घेतलेला हा निर्णय लेखकांना त्यांचे हक्क मिळवून देतो का हे लवकरच समजेल. परंतू आता या निर्णयामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील लेखकांना मात्र नक्कीच फायदा होणार आहे. लेखकांच्या कामाची योग्य दखल यामुळे घेतली जाणार आहे.