‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, जाणून घ्या तिच्या होणाऱ्या पतीबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:28 IST2021-08-20T16:28:07+5:302021-08-20T16:28:36+5:30
आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे.

‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, जाणून घ्या तिच्या होणाऱ्या पतीबद्दल
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. बरेच कलाकार लग्नबेडीत अडकले आहेत. आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर गाण्यातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते आहे.
सिद्धी पाटणे हिने नुकताच आपल्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपला बॉयफ्रेंड विशाल दलाल याच्यासोबत दिसत आहे. विशाल दलाल सोबत लवकरच ती लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. वाढदिवसाचा केक कापताना विशाल सोबत आपण लग्न करणार असल्याचे तिने सांगितले आहे.
लग्नाच्या आधीचा विधी देखील यावेळी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशाल दलाल हा खूप मोठा उद्योगपती आहे. त्याचा आर्किटेक्चरचा व्यवसाय असल्याचे समजते.
गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यातून अभिनेत्री सिद्धी पाटणे घराघरात पोहचली. ती शेवटची सांग तू आहेस का मालिकेतही दिसली होती. त्यासोबतच ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेला पसंती मिळाली होती.
गोव्याच्या किनाऱ्यावर अभिनेत्री सिद्धी पाटणेचा वधूचा गेटअप चाहत्यांनी पाहिला आहे आणि त्यांना तो प्रचंड भावला होता. त्यामुळे तिचे चाहते तिच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.