'गोव्याचे किनाऱ्यावर' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबेडीत, पाहा कोण आहे होणारा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 13:18 IST2021-07-24T13:18:05+5:302021-07-24T13:18:25+5:30
यावर्षी बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे.

'गोव्याचे किनाऱ्यावर' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबेडीत, पाहा कोण आहे होणारा नवरा?
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. यावर्षी बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे. 'गोव्याचे किनाऱ्यावर' या गाण्यातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सिद्धी पाटणे लवकरच लग्न करणार आहे. सिद्धीने तिच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. भावी पतीसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतानाचे काही खास क्षण तिने शेअर केले आहेत.
गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यातून अभिनेत्री सिद्धी पाटणे हिने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या गाण्यात तिने केलेला पारंपारिक लूक सगळ्याचे लक्ष वेधून घेणारा होता. या गाण्याने सिद्धीला एक वेगळी ओळख दिली. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यानंतर अभिनेत्री सिद्धी पाटणेने अनेक प्रोजेक्टसमध्ये काम करताना दिसली. शेवटची ती स्टार प्रवाह वाहिनीवरील सांग तू आहेस का? या मालिकेतही पहायला मिळाली होती.
आता सिद्धी पाटणे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच सिद्धीच्या भावी पतीसोबतचे काही फोटो समोर आले आहेत. सिद्धीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव विशाल दलाल असून तो स्टुडिओ आर्किटेक्टचर आहे.
गोव्याच्या किनाऱ्यावर सिद्धी पाटणेचा नवरीचा गेटअप चाहत्यांनी पाहिला आहे आणि त्यांना तो खूप भावला होता. त्यामुळे तिचे चाहते तिच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी जास्त उत्सुक आहेत.