'घरत गणपती' चित्रपटगृहात पुन्हा झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:51 IST2025-08-22T16:51:09+5:302025-08-22T16:51:45+5:30
Gharat Ganapati Movie: 'घरत गणपती' या चित्रपटाने रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवल्यानंतर पुन्हा एकदा हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव २९ ऑगस्ट पासून चित्रपटगृहात झळकणार आहे.

'घरत गणपती' चित्रपटगृहात पुन्हा झळकणार
'घरत गणपती' (Gharat Ganapati Movie) या चित्रपटाने रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवल्यानंतर पुन्हा एकदा हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव २९ ऑगस्ट पासून चित्रपटगृहात झळकणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळत असताना गणेशोत्सवाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'घरत गणपती’ हा चित्रपट नवचैतन्य देणारा ठरणार आहे.
याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर म्हणाले की,''अनेकदा प्रेक्षक ‘घरत गणपती’ चित्रपट मोठ्या पडद्यावर पहायला कधी मिळणार? असं विचारत होते. गणरायाच्या आशीर्वादाने त्यांची ही इच्छा पूर्ण करता येतेय याचा खूप आनंद आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पहाण्याची एक वेगळी मजा आहे. एक छान कौटुंबिक कथा व भारतीय संस्कृतीचे दर्शन ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखविले, त्या चित्रपटाचं आज विविध स्तरावर खूप कौतुक होताना दिसतंय.''
पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या विद्यमाने आलेल्या 'घरत गणपती' या भव्य मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव,संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम आदि कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळीच रंगत आणली होती. या चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले होते. आता हीच मजा येत्या २९ ऑगस्टपासून पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.