2016 ठरले मराठी चित्रपटसृष्टीसाठी सर्वसाधारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 15:07 IST2017-01-10T14:12:17+5:302017-01-10T15:07:54+5:30
2016 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीहीसाठी गेल्या अनेक वर्षांसारखाच गेलं,म्हणजे 2-4 चित्रपट वगळता व्यवसायाने उल्लेखनीय असे काही नाही. सुरुवात करूया ...

2016 ठरले मराठी चित्रपटसृष्टीसाठी सर्वसाधारण
2016 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीहीसाठी गेल्या अनेक वर्षांसारखाच गेलं,म्हणजे 2-4 चित्रपट वगळता व्यवसायाने उल्लेखनीय असे काही नाही. सुरुवात करूया सर्वात यशस्वी चित्रपटाने,
सैराट
मागील लेखात या चित्रपटाविषयी बराच उहापोह करून झालाय. 85-90 कोटींचा धंदा तर केलाच या सिनेमांनी पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपट केवळ आशयघन आणि कलात्मक नसून उत्तम व्यवसाय करू शकतात हे सिद्ध केलं. मल्टिप्लेस मराठी सिनेमाला शो देत नाही वगैरे मुद्दे या चित्रपटाने रद्दीत निघाले. त्यानंतर आलेल्या अनेक हिंदी चित्रपटाने सैराटमुळे मल्टिप्लेसमध्ये सावत्र वागणूक मिळाली.
नटसम्राट
हा या वर्षांतला पहिला चित्रपट आणि पहिला यशस्वी चित्रपट. अनेक दिग्गजांनी गाजवलेल्या नाटकावर आधारीत हा चित्रपट होता. केवळ अभिजन वर्गापर्यंत मर्यादित न राहता या चित्रपटाला सर्व स्तरातील प्रेक्षकाला आवडेल अश्या पद्धतीने सादर केल्यामुळे या चित्रपटाला उत्तम व्यावसायिक यश मिळाले.
![]()
व्हेंटिलेटर
तब्बल 100 कलाकारांची फौज असलेला, प्रियांका चोप्रा निर्मित हा पहिला मराठी सिनेमा. 8 नोव्हेंबरच्या आधीच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नोटा बंदीचा फटका बसला. नाहीतर विविध पात्र आणि त्यांचे नातेसंबंध, भावना यांची उत्तम भट्टी जमलेल्या या चित्रपटाला अधिक यश मिळालं असतं. पण कुठल्याही निर्मात्याच्या पहिल्या प्रयत्नच कौतुक झालं आणि यश मिळालं तर त्याचा हुरूप वाढतो. प्रियांका देखील हे मिळालं यश बघून अजून मराठी चित्रपटाची निर्मिती करेल अशी आशा करायला हरकत नाही.
![]()
वजनदार
या चित्रपटाचा विषय म्हणाल तर 60% प्रेक्षकांना जवळचा वाटेल असा-वाढलेलं वजन आणि ते कमी करायला केलेले अतर्क्य प्रयत्न. पण कुठेही वात्रट कॉमेडी करायच्या मोहाला बळी न पडता अतिशय संयतपणे केलेली मांडणी हे या चित्रपटाचं यश. प्रिया बापट आणि सई ताम्हणकरच विशेष कौतुक, म्हणजे 16 किलो वजन हे केवळ एका सिनेमासाठी वाढव्याचं हे खायचं काम नाही.
![]()
Family कट्टा
सेलिब्रेशन या गाजलेल्या नाटकावर आधारित. केवळ एका घरात, एका दिवशी घडणारा हा चित्रपट. नाटकासाठी हा विषय सादरीकरणाला सोपा, पण चित्रपटाला अवघड.पण सर्व कलाकारांच्या सुंदर अभिनयामुळे हा चित्रपट बघताना कुठेही कंटाळा येत नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच शुक्रवारी "जाऊ द्या ना बाळासाहेब" हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे दोन्ही चित्रपटाचे थोडे नुकसान झाले असेल.
![]()
रंगा पतंगा
एक मुस्लिम शेतकरी त्याचे रंगा आणि पतंगा बैल शोधायला निघायला आहे.गो हत्या बंदी,शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक विषय एकत्र असलेला चित्रपट पण म्हणावं तसं यश मिळालं नाही.
![]()
भो भो
प्रशांत दामले डिटेक्टिव्हच्या भूमिकेत आणि मर्डर मिस्ट्री कॉमेडी आणि मेलोड्रामा असे अनेक जॉनर एकत्र असलेला, पण म्हणावं यश न मिळालेला.
या शिवाय फुंत्रू,जाऊ द्या ना बाळासाहेब,अस्तु, YZ,कौल, चौर्य, घंटा हे काही उल्लेखनीय प्रयत्न.
झी, इरोस, इव्हरेस्ट, लँडमार्क फिल्म्स ही नावं वगळता या वर्षी एकही नविन निर्माता यशस्वी होऊ शकला नाही हा चिंतेचा विषय.आशा करूया 2017 अधिक यशस्वी मराठी चित्रपट आणि नविन निर्मात्यांचे असेल.
निरंजन विद्यासागर