गायत्रीने चक्क ट्रक चालवुन पलटवला प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 09:30 IST2016-04-06T16:18:28+5:302016-04-06T09:30:34+5:30

           सिनेमाच्या शुटिंगचे दिवस कलाकारांसाठी खरच खुप काही शिकविणारे अन आठवणी देऊन जाणारे असतात. बºयाचदा ...

Gayatri runs a truck with a few trucks ... | गायत्रीने चक्क ट्रक चालवुन पलटवला प्लॅन...

गायत्रीने चक्क ट्रक चालवुन पलटवला प्लॅन...


/>           सिनेमाच्या शुटिंगचे दिवस कलाकारांसाठी खरच खुप काही शिकविणारे अन आठवणी देऊन जाणारे असतात. बºयाचदा युनिटमध्ये काही कलाकार, डिरेक्टर अन कधीकधी तर सगळी टिमच मजेशीर असते. मग हलक्याफुलक्या वातावरणात शुटिंग कधी संपते याचा पत्ताच कलाकारांना लागत नाही. सेटवर वेगवेगळे प्रँक करायचे अन कलाकारांची मजा पहायची असे गमतीदार किस्से तर बºयाचदा होतात. असाच एक भन्नाट अनुभव रेतीच्या गावरान हिरोईन ला म्हणजेच आपल्या गायत्री सोहमला आला आहे. सीएनएक्स सोबत केलेल्या एका मुलाखतीमध्ये गायत्रीने हा एक्सपिरिअन्स शेअर केला. गायत्री म्हणते, माझा पहिला दिवस शुटिंगचा आरामात पार पडला. डायरेक्टरला आवडला म्हटले बास आपण बाजी जिंकली. पण दुसºयाच दिवशी माझ्यावर बाँम्ब फुटला कि तुला उद्या ट्रक चालवायची आहे.मी फोर व्हीलर चालवते हे सर्वांना माहित होते पण आमच्या प्रोडक्शन अन डायरेक्शन टिम ने मुद्दाम मला वेड्यात काढण्यासाठी हा प्लॅन केला होता. मी सुद्धा त्यांच्या या प्रँकला बळी पडले आहे असा आव आणला. सकाळी सगळे युनिट माझी मजा बघायला तयार होते. मी ट्रक मध्ये बसले आणि चावी मागितली. मग सगळ््यांचेच धाबे दणाणले. कोणी चावी द्यायला तयार नव्हते. मी पण हट्ट केला जोपर्यंत ट्रक चालवु देणार नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही. ड्रायव्हर दादा आले त्यांनी चावी दिली ते साईडला बसले पण मी सांगितले डायरेक्टर सुहास देखील सोबत हवा. सुहास घाबरत ट्रक मध्ये बसला अन मी जवळपास १ किलोमीटर ट्रक चालवला. सगळेच चकित झाले होते. मी ट्रक, रिक्षा, टॅम्पो, ट्रॅक्टर सगळ काही चालवु शकते हे समजल्यावर प्लॅन करणाºयांचे चेहेरे उतरले होते तर काहींचे हात टाळ््या वाजवत होते. क्या बात है गायत्री.. तुझ्या या टॅलेंटला सीएनएक्स टिम कडुन देखील थम्सअप.

Web Title: Gayatri runs a truck with a few trucks ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.