गायत्रीला करायचाय ‘मॉडर्न रोल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 17:12 IST2016-03-21T01:00:22+5:302016-03-22T17:12:49+5:30
‘कन्यादान’ मालिकेत आपल्या मुलीला वडिलांच्या रागापासून वाचवण्यासाठी धडपडत असलेली आई, सतत इतरांचा विचार करणारी अशी भूमिका साकारणारी गायत्री सोहम. ...

गायत्रीला करायचाय ‘मॉडर्न रोल’
‘ न्यादान’ मालिकेत आपल्या मुलीला वडिलांच्या रागापासून वाचवण्यासाठी धडपडत असलेली आई, सतत इतरांचा विचार करणारी अशी भूमिका साकारणारी गायत्री सोहम. अशा या गायत्रीला आता डॅशिंग, मॉडर्न गर्लचा रोल साकारायचा आहे.
याविषयी गायत्रीने ‘लोकमत सीएनएक्स’शी मनमोकळ्या गप्पा मारताना सांगितले की, ‘मी जेव्हा इंडस्ट्रीत आले, तेव्हा अनेकांनी मला तुझे लूक्स, तुझा घोगरा आवाज या सर्व गोष्टी निगेटिव्ह पॉइंट असल्याचे सांगत काम नाकारले, पण माझी चिकाटी कायम होती. कालांतराने जेव्हा भूमिका मिळत गेल्या त्या अगदी माझ्या स्वभावाच्या विरोधात मिळाल्या. जसे की, अत्यंत शांत, संयमी, सोज्ज्वळ भूमिकाच केल्या.’
![]()
आता तुला कोणती भूमिका करायची इच्छा आहे, असे विचारल्यावर, तिने ‘मॉर्डन स्त्री’ची किंवा ‘निगेटिव्ह’ भूमिका करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. तिच्या चाहत्यांना ती लवकरच एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचे गोड गुपितही तिने या वेळी उलगडले. तिच्या पुढच्या सर्व वाटचालींसाठी ‘लोकमत सीएनएक्स’कडून शुभेच्छा देऊया.