​तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर यांची मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2017 11:03 AM2017-04-17T11:03:30+5:302017-04-17T16:33:30+5:30

दोन अभिनेत्री एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असूच शकत नाही असे म्हटले जाते. पण यासाठी मराठीतील दोन अभिनेत्री अपवाद ठरल्या आहेत. ...

Friendship with Tejashri Pradhan and Swachi Adarkar | ​तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर यांची मैत्री

​तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर यांची मैत्री

googlenewsNext
न अभिनेत्री एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असूच शकत नाही असे म्हटले जाते. पण यासाठी मराठीतील दोन अभिनेत्री अपवाद ठरल्या आहेत. छोट्या पडद्यावर आपले नाव गाजवणाऱ्या दोन अभिनेत्री या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर या दोघांनी झी मराठी या वाहिनीवरील मालिकांमध्ये काम केले होते. तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेत तर सुरुचीने का रे दुरावा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्या दोघी एकाच वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या असल्या तरी या दोघांनी कधीही एकत्र काम केलेले नाही. तेजश्री आणि सुरुची कोणत्याही चित्रपट, मालिका अथवा नाटकात कधीही एकत्र झळकल्या नसल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या एकमेकांच्या खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघींची मैत्री ही अनेक वर्षांपासूनची आहे. झी मराठी वाहिनीच्या अनेक कार्यक्रमात प्रेक्षकांना त्यांना एकत्र पाहायला मिळाले आहे. तसेच त्या काही महिन्यांपूर्वी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातदेखील एकत्र झळकल्या होत्या. 
सुरुची आणि तेजश्री नेहमीच एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. या फोटोंमधूनच या दोघींच्या मैत्रीबद्दल त्यांच्या फॅन्सना कळते. तेजश्रीने नुकताच एक सुरूचीसोबतचा फोटो पोस्ट करून त्यावर या फोटोला कॅप्शनची गरज आहे का असे सुरुचीला विचारले आहे. हा फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तेजश्री आणि सुरुची दोघीही खूपच सुंदर दिसत आहेत. या सेल्फीला अनेकांनी लाइक केले असून अनेकांनी या फोटोवर कमेंटदेखील केले आहे. 



Web Title: Friendship with Tejashri Pradhan and Swachi Adarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.