'दोस्ताचा पहिला हिंदी सिनेमा येतोय...' हेमंत ढोमेची समीर विद्वांससाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:02 AM2023-06-29T10:02:06+5:302023-06-29T10:03:47+5:30

'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटातून मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस(Sameer Vidhwans)ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

'friend's first Hindi movie is coming...' Hemant Dhome's special post for Sameer Dhwans | 'दोस्ताचा पहिला हिंदी सिनेमा येतोय...' हेमंत ढोमेची समीर विद्वांससाठी खास पोस्ट

'दोस्ताचा पहिला हिंदी सिनेमा येतोय...' हेमंत ढोमेची समीर विद्वांससाठी खास पोस्ट

googlenewsNext

'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटानंतर आता चर्चा आहे ती 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटाची. या चित्रपटातून अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) 'भुलभुलैया २' नंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटातून मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस(Sameer Vidhwans)ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे(Hemant Dhome)ने पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये त्याचा मित्र समीर विद्वांसचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेमंत ढोमेने सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, उद्यापासून आपल्या दोस्ताचा समीर विद्वांसचा पहिला हिंदी सिनेमा येतोय… तो पण एवढा मोठा! त्याला भरभरून यश मिळेलच… ते पुढचं सगळं होईलंच! पण आज सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतायत…ॲक्सीडेंट झाला तरी झालेलं त्याचं FTII चं ॲडमिशन… त्याने पहिल्यांदा लिहिलेली फिल्म, त्याने पहिलं दिग्दर्शित केलेलं नाटक, त्याने दिग्दर्शित केलेली पहिली फिल्म… त्याची सगळी पहिली कामं!

आपल्यासारखा खुष माणुस दुसरा नाही! 
तो पुढे म्हणाला की, त्यांचं पहिलं ब्रेकअप, त्याचं लग्नं, नाईट आऊट्स, दोघातंच खाल्लेला पोटभर बुर्जी पाव आणि ते सगळंच! उधारी, भांडणं, पोरी, अबोला सग्गळं! पण आज आपल्या सारखा खुष माणुस दुसरा नाही! आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं होतंय हेच फिलींग आहे… नेहमीप्रमाणे तो चांगलं काम करेलंच, सिनेमा चांगला होईलंच! पण त्याची ही झेप महत्त्वाची आहे…त्याच्यासकट आमचंही आयुष्य बदलू दे! त्याला खूप खूप यश मिळूदे! सम्या, लव यू!! खूप मोठा हो, तुझ्या सोबत आम्ही सुद्धा मोठे होतोय!

समीर विध्वंसच्या वर्कफ्रंटबद्दल..
समीर विद्वांसने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांचे लेखन-दिग्दर्शन केेले आहे. यात 'टाईमप्लीज', 'आनंदी गोपाळ', 'मला काहीच प्रोब्लेम नाही', 'डबल सीट', 'समांतर', 'धुरळा', 'YZ' या चित्रपटांचा समावेश आहे. त्याच्या आनंदी गोपाळ या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यातून त्याला राष्ट्रीय पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: 'friend's first Hindi movie is coming...' Hemant Dhome's special post for Sameer Dhwans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.