फिरोझ अब्बास खान यांचा लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 18:57 IST2017-04-11T13:24:08+5:302017-04-11T18:57:26+5:30

​भारतीय रंगभूमीवरील एक प्रसिद्ध नाव म्हणजे फिरोझ अब्बास खान. प्रसिद्ध दिग्दर्शक, नाट्य लेखक आणि पटकथाकार  फिरोझ अब्बास खान यांना ...

Folk nomination of Feroze Abbas Khan, Maharashtrian of the Year Award | फिरोझ अब्बास खान यांचा लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराने सन्मान

फिरोझ अब्बास खान यांचा लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराने सन्मान

ारतीय रंगभूमीवरील एक प्रसिद्ध नाव म्हणजे फिरोझ अब्बास खान. प्रसिद्ध दिग्दर्शक, नाट्य लेखक आणि पटकथाकार  फिरोझ अब्बास खान यांना यंदाच्या रंगभूमी विभागातील लोकमत  ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. उदय निरगुडकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतीय रंगभूमीवरील पृथ्वी थिएटरशी सगळ्यात आधी ज्यांचा संबंध जोडला गेला त्या मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणजे फिरोझ अब्बास खान. पृथ्वी थिएटरचे ते पहिले आर्टिस्टिक दिग्दर्शक ठरले. गेल्या 3 दशकांहून अधिक काळापासून रंगभूमीवर सक्रीय असलेल्या फिरोझ अब्बास खान यांनी विविध कलाकृतींमधून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. ‘आॅल द बेस्ट’,‘इवा मुंबई में चल जायें’, ‘सालगिरह’, ‘महात्मा ५२ गांधी’, ‘सेल्समन रामलाल’, ‘तुम्हारी अमृता’, ‘कुछ भी हो सकता है’ अशा एकाहून एक सरस नाट्यकृतींनी रसिकांची मनं जिंकली आहेत. ‘गांधी माय फायर’ या सिनेमाचं दिग्दर्शन करताना त्यांनी शबाना आझमी, अनुपम खेर, फारुख शेख अशा बॉलिवूडच्या दिग्गजांसह काम केलं. मात्र त्यांचं पहिलं प्रेम हे रंगभूमी आणि नाटक हेच राहिलं आहे. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये माईलस्टोन ठरलेल्या ‘मुघल-ए-आझम’ या सिनेमावर आधारित ‘मुघल-ए-आझम’ हे नाटक रंगभूमीवर घेऊन आले. त्यांचा हा प्रयोग नाट्यरसिकांना चांगलाच भावला. रंगभूमीसाठी फिरोझ अब्बास खान यांनी दिलेलं योगदान आणि त्यांचं नाट्यकलेवर असलेले प्रेम पाहून त्यांना ‘मुघल-ए-आझम’ या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवरील योगदानासाठी पुरुष कॅटेगरीतील लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर-2017 या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांना उदय निरगुडकर यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

Web Title: Folk nomination of Feroze Abbas Khan, Maharashtrian of the Year Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.