रिचा अग्निहोत्रीचे पंचतत्व थीम फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 11:27 IST2016-11-03T11:25:00+5:302016-11-03T11:27:19+5:30

हिप हॉप आणि बी-बोईंग हे डान्स फार्म मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त प्रचलित आहेत.मात्र यात मुलीही कुठेही कमी नसल्याचे  रिचाने तिच्या ...

Five-piece theme photoshoot of Richa Agnihotri | रिचा अग्निहोत्रीचे पंचतत्व थीम फोटोशूट

रिचा अग्निहोत्रीचे पंचतत्व थीम फोटोशूट

प हॉप आणि बी-बोईंग हे डान्स फार्म मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त प्रचलित आहेत.मात्र यात मुलीही कुठेही कमी नसल्याचे  रिचाने तिच्या डान्स शोज मधून  हे सिध्द करून दाखवले आहे. तिने केलेल्या फोटोशूटमध्येही डान्स फॉर्म असलेल्या अवघड पोश्चर्सचा वापर केला आहे.कथ्थक ह्या नृत्यशैलीत पारंगत असलेल्या रिचाने 'ढोलकीच्या तालावर' या रिअॅलिटी शोमध्ये लावणी नृत्यकरून रसिकांचीही वाहवा मिळवली होती. या रिअॅलिटी शोमध्ये टॉप फाईव्ह पर्यंत पोहचली होती.लावणी सोबत कथ्थक आणि झामा सारख्या वेस्टर्न डान्स फॉर्मचं फ्युजन करून लावणीत आपला वेगळेपण सिद्ध केला होता.



डान्स आणि अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहणा-या रिचा अग्निहोत्रीने पंचत्त्वाच्या थीमवर हटके फोटोशूट केले आहे. रिचाने तिच्या फोटोशूटमध्ये डान्सस्टेपच्या पोझ देत आग,पाणी,हवा,आकाश,आणि धरती या पाचही तत्वे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.तिच्या एका फोटोशूटमध्ये अवतीभोवती आग पसरली असून हातात तलवार घेत योध्याच्या लूकमध्ये ती दिसतेय.



तर कधी गिटार,पाणी आणि हाय डान्सीकल जम्प घेतली करतांना दिसतेय. मराठी रसिकांची मनं जिंकल्यानंतर आता रिचा साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपल्या नृत्यशैलीने रसिकांची वाहवा मिळवतेय. साऊथमधला 'किक'या डान्स रिएलिटी शोमध्येही तिने टॉप आठ पर्यंत पोहोचली आहे. मॉडर्न कथ्थक सादर करत परीक्षकांनाही आश्चर्यचकीत करून सोडलंय. इतकंच नाही तर महाराष्ट्राची शान असलेली लावणी त्या रंगमंचावर दणक्यात परफॉर्म करून लावणी कर्नाटकापर्यंत पोहचवली आहे.



फोटोशूटच्या या निमित्ताने रिचाने मराठी इंडस्ट्रीतही 'थीम फोटोशूटचा' नवा ट्रेंड सेट केला आहे.

Web Title: Five-piece theme photoshoot of Richa Agnihotri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.