भिकारीतील या गाण्याची पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 13:29 IST2016-12-21T13:29:47+5:302016-12-21T13:29:47+5:30
गणेश आचार्य दिग्दर्शित करणाºया भिकारी या पहिल्या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये केवळ एकच गाणे ...

भिकारीतील या गाण्याची पहिली झलक
ग ेश आचार्य दिग्दर्शित करणाºया भिकारी या पहिल्या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये केवळ एकच गाणे आहे. हे गाणे बॉलिवूडचा आघाडीचा गायक सुखविंदर सिंग गाणार असल्याचे देखील आम्ही तुम्हाला सांगितले होते. देवा हो देवा हे गणपती बाप्पाचे गाणे या चित्रपटातील आकर्षण असणार आहे. या गाण्याचा पहिला लुक अभिनेता स्वप्निल जोशीने नुकताच सोशल साईट्सवर उलगडला आहे. या फोटोमध्ये आपल्याला सगळीकडेच घंटा अडकविलेल्या दिसत आहेत. चित्रपटातील प्रमुख भूमिका स्वप्निल साकारत असल्याने या गाण्यात देखील आपल्याला स्वप्निलचे ठुमके दिसू शकतात. एवढेच नाही तर गणेश आचार्य यांची हटके स्टाईल देखील या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. गाण्याचे चित्रीकरण तर सुरु झाले आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार असून पुढील वर्षी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज होणार असल्याचे समजतेय. आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर भाष्य करणारा हा भावनिक विषय गणेश आचार्य यांनी भिकारी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची सुरुवातीपासूनच चर्चा सुरु आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील या चित्रपटाचा मुहूर्त करुन या सिनेमाच्या संपूर्ण टिमला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी चित्रपटांची कोरिओग्राफी करतानाच आता गणेशजी मराठीत दिग्दर्शकीय इनिंगही सुरू करत आहेत. अनेक वर्षा पासून मित्र असलेले गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रोडक्शन ची स्थापना करून चित्रपट निर्मिती मधे प्रथम पाऊल टाकले आहे. भिकारी हा चित्रपट मोठ्या बिजनेस कुटुंबातील आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर बेतला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
![]()