मराठीतमध्ये पहिल्यांदा सेक्स कॉमेडीवर आधारित चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 10:53 AM2017-01-05T10:53:46+5:302017-01-05T11:00:59+5:30

बॉलिवुडमध्ये अनेक अ‍ॅडल्ट्स असलेले चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले आहे. जसे की, क्या खुल है हम, मस्तीजादे अशी अनेक सेक्स कॉमेडी ...

Films based on the first sex comedy in Marathi | मराठीतमध्ये पहिल्यांदा सेक्स कॉमेडीवर आधारित चित्रपट

मराठीतमध्ये पहिल्यांदा सेक्स कॉमेडीवर आधारित चित्रपट

googlenewsNext
लिवुडमध्ये अनेक अ‍ॅडल्ट्स असलेले चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले आहे. जसे की, क्या खुल है हम, मस्तीजादे अशी अनेक सेक्स कॉमेडी करणारे चित्रपट आहेत. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत असे चित्रपट येण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. मात्र दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी मराठीमध्ये असे चित्रपट दाखविण्याचे धाडस केले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा लवकरच अ‍ॅडल्ट्स ओन्ली हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट फक्त अ‍ॅडल्ट्स म्हणजे प्रौढांसाठी असणार आहे. एवढेच नाही तर त्यांनी या चित्रपटाचे प्रमोशनदेखील सुरू केले आहे. या चित्रपटाचे नुकतेच  सोशलमीडियावर जाहिरात करण्यात आहे. त्यांनी कंडोमच्या पाकिटावर लिहिलेले अ‍ॅडल्ट्स ओन्ली आणि फक्त प्रौढांसाठीच अशी जाहिरात मिलिंद यांनी सोशलमीडियावर प्रदर्शित केली असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्याकडे लैंगिकतेबद्दल सहसा कोणी उघडपणे बोलत नाही. हा विचार करता मिलिंद यांनी अ‍ॅडल्ट्स ओन्ली या चित्रपटातून एकंदरीतच लैंगिक  शिक्षण, कुमारवयीन माता याचबरोबर वेश्या व्यवसायावरही भाष्य केले असल्याचे दिसत आहे. कारण .या चित्रपटाचा टीझर सोशलमीडियावर नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला १ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तसेच यापूर्वी दिग्दर्शक रवी जाधव यांनी बालक पालक या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचा विषय हाताळला होता. आता मात्र सेक्स कॉमेडी हा विषय मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. मिलिंद कवडे यांनी येडयांची जत्रा, शिनमा, १२३४ यासारखे अनेक मराठी चित्रपट केले आहे. आता हा अ‍ॅडल्ट्स ओन्ली असा हटके चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना सर्व नवोदित कलाकार पाहायला मिळणार आहे. 


 
 






















Web Title: Films based on the first sex comedy in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.