बघतोस काय मुजरा कर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 10:28 IST2017-01-06T10:28:36+5:302017-01-06T10:28:36+5:30
हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक दिवस रंगत आहे. या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. खास प्रेक्षकांची ही इच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे. कारण या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे

बघतोस काय मुजरा कर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
ह मंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक दिवस रंगत आहे. या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. खास प्रेक्षकांची ही इच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे. कारण या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहताच, प्रेक्षकांच्या ओठी सहज वाह काय ट्रेलर आहे असा शब्द बाहेर पडेल. त्याचप्रमाणे समाजात आपण काय करत आहोत असा प्रश्नदेखील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांची गड अन किल्ले... काय अवस्था करुन ठेवली आहे आपण? जिथे महाराजांनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वत:चं रक्त सांडलं तिथे बसून दारु प्यावी, गुटखा खाऊन थुकावं हा विचार कुठून येत असेल? इंग्रजानी इतिहास कसा जपून ठेवला आहे. आपल्याकडे होईल का असं?असे कित्येक प्रश्न या ट्रेलरमध्ये विचारण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला खरचं विचार करायला भाग पाडणारा हा बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचा ट्रेलर आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या माध्यमातून अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे आणि जितेंद्र जोशी या कलाकारांची ओळख करून ेदेण्यात आली आहे. एवरेस्ट एंटरटेनमेंट, गणराज प्रॉडक्शन प्रस्तुत, हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची छोटीशी झलक सोशल मिडीयावर प्रदर्शित झाली आहे. या ट्रेलरला सोशलमीडियावर प्रचंड लाइक्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मोठया प्रमाणात कमेंन्टदेखील मिळत असल्याचे दिसत आहे.