'फॅन्ड्री' फेम जब्याचा 'फ्री हिट दणका', आता त्याला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 15:39 IST2021-11-20T15:39:27+5:302021-11-20T15:39:56+5:30

'फॅन्ड्री' चित्रपटात जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडेने साकारली होती. या चित्रपटातून त्याला घराघरात ओळख मिळाली होती.

'Fandry' fame Jabba's will be seen in 'free hit Danaka', now it is difficult to recognize him | 'फॅन्ड्री' फेम जब्याचा 'फ्री हिट दणका', आता त्याला ओळखणं झालंय कठीण

'फॅन्ड्री' फेम जब्याचा 'फ्री हिट दणका', आता त्याला ओळखणं झालंय कठीण

फॅन्ड्री चित्रपटात जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडेने साकारली होती. या चित्रपटातून त्याला घराघरात ओळख मिळाली होती. त्यानंतर आता तो एका नव्या चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे. फ्री हिट दणका. हा सिनेमा १७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात सोमनाथ अवघडे दमदार फटकेबाजी करताना दिसत आहे. 

ग्रामीण कथेवर आधारित फ्री हिट दणका या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील मगरे यांनी केले आहे. क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. 


उघडेवाडी आणि निगडेवाडी या दोन गावातील नेत्यांमधील वैमनस्यातून क्रिकेटच्या मॅचचे आयोजन केले जाते. या मॅचचा विजेता नक्की कोण ठरतो? या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नायकाच्या प्रेमाचा बळी जातो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रेक्षकांना या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यामुळे अधिकच वाढली आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटात अपूर्वा एस. हिच्यासह 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या), सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: 'Fandry' fame Jabba's will be seen in 'free hit Danaka', now it is difficult to recognize him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.