'फॅमिली ४२0'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:43 IST2016-01-16T01:10:28+5:302016-02-10T10:43:27+5:30

 गंमतीशीर नावाबाबत उत्कंठा वाढविणाºया या चित्रपटाचा मुहूर्त अंधेरीतील ए. बी. स्टुडिओमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन आणि चित्रपट महामंडळाचे ...

'Family 420' | 'फॅमिली ४२0'

'फॅमिली ४२0'

 
ंमतीशीर नावाबाबत उत्कंठा वाढविणाºया या चित्रपटाचा मुहूर्त अंधेरीतील ए. बी. स्टुडिओमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या चित्रपटाची संकल्पना देव राज यांची असून, संतोष गायकवाड हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
एके काळी मराठी चित्रपट म्हटला, तर कॉमेडीची मेजवानी होती; पण काळाच्या ओघात परिस्थिती बदलली व मराठी चित्रपटसृष्टी गंभीर विषयांकडे वळली. हे जरी खरे असले, तरी मराठी माणूस आजही कॉमेडी व मनोरंजक पैसा वसूल चित्रपटाला तेवढीच दाद देतो हे देखील तितकेच खरे आहे. याच दृष्टिकोनातून या चित्रपटाची निर्मिती करीत असल्याचे निमार्ता देव राज सांगतात.
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची सांगड या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या लेखनाबरोबर सुबोध नागदेवे यांनी बिना सातोस्कर यांच्या सहकार्याने चित्रपटातील गीते लिहिली असून, संगीतकार सुशील पेंढारी यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात विजय पाटकर, विजय कदम, भूषण कडू, सुनील पाल, हर्षदा पाटील, सुकन्या कुलकर्णी, गीता निखारगे अशा कलाकारांची फौज पाहायला मिळेल.

Web Title: 'Family 420'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.