​मराठी चित्रपटातील प्रायोगिकता हिंदीला न झेपणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 09:22 IST2016-10-19T23:09:55+5:302016-10-20T09:22:43+5:30

प्रयोगशीलतेच्या दृष्टीने मराठी सिनेमा हिंदीच्याही खूप पुढे गेला आहे. वेगवेगळे अन् धाडसी विषय हाताळून मराठी सिनेमाने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ...

The experimental Marathi film does not have Hindi | ​मराठी चित्रपटातील प्रायोगिकता हिंदीला न झेपणारी

​मराठी चित्रपटातील प्रायोगिकता हिंदीला न झेपणारी

ong>प्रयोगशीलतेच्या दृष्टीने मराठी सिनेमा हिंदीच्याही खूप पुढे गेला आहे. वेगवेगळे अन् धाडसी विषय हाताळून मराठी सिनेमाने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली वेगळी छाप उमटविली आहे. मराठीत तयार होणारे चित्रपट एवढे चांगले आहेत की त्यांची तुलना प्रादेशिक भाषेतील चित्रपटांशी होऊ शकत नाही. एखाद्या निर्मात्याने किंवा दिग्दर्शकाने मराठीतील चित्रपटाला हिंदीत रुपांतरीत करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याचा दर्जा सांभाळूच शकणार नाही, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री अमिता खोपकरने सीएनएक्सशी बोलताना व्यक्त केले. 

प्रश्न : तुम्ही आता हिंदी मालिकांमध्ये काम करीत आहात, येथेही तुमची फार प्रसंशा होत आहे? 
अमिता खोपकर :
मला मराठीमध्येच काम करायला आवडते.  हिंदी मालिकांत मी मागील काही वर्षांपासून काम करीत असले तरी इकडे माझी एन्ट्री बायचांस झाली. येथील वातावरण मराठी सारखेच आहे. पण थोड प्रोफेशनल आहे. आम्ही कुुटुंबासारखेच झालो आहोत. सकाळीपासून ते रात्रीपर्यंत शूटिंगचा शेड्युल असतो. सिरिअल्स म्हणजे आमची एकप्रकारे नोकरीच झाली म्हणा ना!.

प्रश्न : तुम्ही लेखनही करता इतक्यात काही लिहलेय?
अमिता खोपकर : 
लेखन हा माझा तसा पिंड नाही. मात्र काही वृत्तपत्रातून माझे लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी काम केलेल्या जन्मरहस्य या नाटकाच्या निमित्ताने मला लिहण्याची संधी मिळाली होती बस्स तेवढेच.

प्रश्न : टीव्ही के उस पार या हिंदी मालिकेत तुम्ही काम करीत आहात. ही भूमिका कशी आहे?
अमिता खोपकर : या मालिकेत मी मधू नावाच्या एका सामान्य बाईच्याच भूमिकेत दिसणार आहे. मधू घरी राहणारी, घर सांभाळणारी असली तरी तिला टीव्हीचे प्रचंड वेड आहे. ती टीव्हीच्या आभासी जगात रमणारी आहे. ती पाहत असलेल्या मालिकांमध्ये ती जगते. टीव्ही हेच जग आहे असे तिला वाटते. आपल्याकडे सिनिअर सिटीजन बायकांना असेच वेड असते. याचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. एका  मालिकेत काम करताना काही लोकांना त्या मालिकेशी संबधित प्रश्न विचारले होते. यावरून तुम्हाला टीव्हीवर असलेले बायकांचे प्रेम कळू शकते. मी साकारत असलेल्या मधूकडे काही सुपर पार्वस आहेत. 

प्रश्न : आताचा टीव्ही पूर्वीच्या तुलनेत प्रगल्भ झाल्यासारखा वाटतो? 
अमिता खोपकर :नाही, सध्या तरी नाही. टीव्ही मला पूर्वीपासूनच काळाच्या मागे नेणारा वाटतो. त्यात अजूनही ती प्रगल्भता आलेली नाही. मात्र ज्या लोकांना केवळ मनोरंजन हवे आहे अशांसाठी हे माध्यम ठिक आहे. नाटक, चित्रपटांच्या तुलनेत टीव्ही प्रगल्भ व्हावा ही आता काळाची गरज झाली आहे. 

प्रश्न : मराठी चित्रपटात आता चांगली कमाई करू लागले आहेत, सैराट याचे उदाहरण आहे? 
अमिता खोपकर : ‘सैराट’पेक्षा नागराजचा फँड्री मला आवडला. सैराट हे फँड्रीचे पुढील वर्जन होते असे म्हणता येईल. मात्र सैराटला मांडण्याची पद्धत मात्र नवी होती. तो अगदी नॅचरल पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर आला. सैराटच्या यशात अनेक गोष्टी असल्या तरी त्याचे संगीत हीच खरे सैराटच्या यशाचे कारण असावे असे मला तरी वाटते. मुळात मराठी सिनेमा फार पुढे गेलेला आहे, वेगवेगळे विषय मराठीतून चांगल्याप्रकारे हाताळले आहेत. यामुळे मराठी चित्रपट आणखी पुढे जातील ऐवढे नक्की. 

प्रश्न : प्रादेशिक भाषांमधील अनेक चित्रपटांचे हिंदीत रूपांतरण होत आहे, मराठीचेही व्हावे असे तुम्हाला वाटते का?
अमिता खोपकर : मराठी चित्रपटाचा दर्जा हा खूप चांगला आहे. दर्जेदार चित्रपट निर्मिती हेच मराठीचे वैशिष्ठ्य आहे. मराठी चित्रपटांचा दर्जा हिंदीत रुपांतरीत होताना सांभाळला जाण्याची शक्यता कमीच आहे. मराठीच्या तुलनेत हिंदी चित्रपट तयार करताना तांत्रिक दृष्ट्या तो चांगला असेलही पण त्याचा आत्मा तो नसेल. एखाद्या कलाकृतीचा दर्जा कायम राखणे हे सोपे काम नाही. ते हिंदीमध्ये होऊ शकेल असे वाटत नाही. मराठी चित्रपट नव्या रूपात दिसतो आहे. मराठी वाल्यांनी मराठीचे, हिंदी वाल्यांनी हिंदीचे काम करावे. 

प्रश्न : मालिकांशिवाय दुसºया काही प्रोजेक्टस्वर काम करीत आहात?
cnxoldfiles/span> नाही सध्या तरी एकही नाही. हीच एक मालिका बस्स...

Web Title: The experimental Marathi film does not have Hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.