Exclusive कथा तयार पण निर्माताच मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 16:21 IST2016-11-10T14:03:48+5:302016-11-11T16:21:16+5:30
प्रियंका लोंढे मराठी चित्रपटांना आज सुगीचे दिवस आले आहेत. आपला मराठी सिनेमा सातासमुद्रापार जाऊन पोहचला आहे. बॉक्स आॅफिसवर चांगली ...

Exclusive कथा तयार पण निर्माताच मिळेना
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">प्रियंका लोंढे
मराठी चित्रपटांना आज सुगीचे दिवस आले आहेत. आपला मराठी सिनेमा सातासमुद्रापार जाऊन पोहचला आहे. बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई देखील मराठी चित्रपटांची होताना दिसत आहे. असे जरी असले तरी काही चित्रपट हे उत्तम कथा असुनही पुढे जात नसल्याचेच निदर्शनास येत आहे. आमच्याकडे कथा आहे पण निर्माता नाही असे सांगणारे अनेकजण तुम्हाला पाहायला मिळतील. अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. पोंक्षे सांगतात, माझ्याकडे दोन चित्रपटांच्या कथा लिहून पुर्ण आहेत परंतु मला निर्माताच मिळत नाही. गेल्या तीन वर्षांपासुन मी निर्मात्यांच्या शोधात आहे. परंतु माझ्या अटींवर काम करणारा निर्माता अजुन तरी मला सापडलेला नाही. चित्रपटासाठी दोघांनी एकत्र अकाऊंट उघडायचे आणि त्यात पैसे जमा करुन कामाला सुरुवात करायची. मधे काम थांबल नाही पाहिजे. हे एक करोड घे आणि पहिले शेड्युल्ड लाव असे सांगून जर काम सुरु केले तर दुसºया शेड्युल्डचे काय? हा प्रश्न देखील उपस्थित होते. त्यामुळे अडीच करोड चित्रपटाचे बजेट आहे तेवढे आपण दोघांनीही जमा करायचे आणि मगच कामाला सुरुवात करायची. अशाच पद्धतीने मला काम करायचेय. जर सिनेमा झाला नाही तरी चालेल पण काम करायचे तर याच अटींवर. अनेकजण येतात त्यांना कथा आवडते पण पुढे काही होत नाही. मला असे वाटते कि प्रत्येक कलाकृतीची एक वेळ ठरलेली असते. पाहुयात हा चित्रपट कधी जमुन येतोय. असेही पोंक्षे यांनी सांगितले.