​ Exclusive नागराजने केले आमीरच्या व्हीडीओचे दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 17:50 IST2016-12-31T17:50:58+5:302016-12-31T17:50:58+5:30

  प्रियांका लोंढे नागराज मंजुळे सैराट या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चांगलाच प्रकाशझोतात आला. नागराजचे चित्रपट हे सामाजिक विषयांवर भाष्य करणारे असतात. ...

Exclusive Nagarajan did a video of Aamir's video | ​ Exclusive नागराजने केले आमीरच्या व्हीडीओचे दिग्दर्शन

​ Exclusive नागराजने केले आमीरच्या व्हीडीओचे दिग्दर्शन

  प्रियांका लोंढे


नागराज मंजुळे सैराट या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चांगलाच प्रकाशझोतात आला. नागराजचे चित्रपट हे सामाजिक विषयांवर भाष्य करणारे असतात. उत्तम आशय असलेल्या नागराजच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. मराठीच काय पण नागराजच्या झिंगाटवर संपूर्ण बॉलिवूड नाचले. बॉलिवूडमधील सुपरस्टार देखील सैराटमय झालेले पाहायला मिळाले. नागराज एक उत्कृष्ठ दिग्दर्शक असल्याचे आपल्याला माहितच आहे. राष्ट्रीय पुरस्कारांवर माहोर उमटविलेल्या नागराजने आता थेट बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट आमीर खानच्या एका व्हीडीओचे दिग्दर्शन केले आहे. होय, आमीर आणि नागराज पहिल्यांदाच या निमित्ताने एकत्र आले आहेत. आमीर सोबत काम करण्यासाठी प्रत्येकजणच उत्सुक असतात. आपला मराठमोळा नागराज देखील काही कमी नाही. सैराट या चित्रपटाने त्याने सगळ््यांनाच वेड लावले आहे. त्यामुळेच की काय आमीरने त्याच्या व्हीडीओसाठी नागराजची निवड केली असावी. परंतू हा व्हीडीओ आमीरचा म्हणजेच, आमीरच्या पाणी फाऊंडेशसाठी तयार केलेला आहे. आमीर पाणी फाऊंडेशसाठी कार्यरत आहे. नुकताच त्याने या सामाजिक कार्यासाठी एक व्हीडीओ शूट केला आहे. या व्हीडीओचे दिग्दर्शन नागराजने केले असल्याचे समजतेय. तर गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत असून अजयने हे गाणे गायले आहे. तसेच गुरु ठाकुरचे शब्द या गाण्याला आहेत. लवकरच या व्हीडीओचे अनावरण करण्यात येणार आहे. या व्हीडीओमध्ये आमीर असणार की नाही हे मात्र अजुन तरी गुलदस्त्यातच आहे. परंतू आमीर आणि नागराज या निमित्ताने एकत्र तरी आले आहेत. त्यामुळे जर नागराजच्या आगामी एखादया चित्रपटात आपल्याला आमीर मराठमोळ््या अंदाजात दिसला तर जास्त आश्चर्य वाटायला नको. कारण या सैराट दिग्दर्शका सोबत काम करण्याची इच्छा तर आता सगळ््यांनाच होत आहे. पण तुर्तात तरी आपण आमीर आणि नागराजच्या या व्हीडीओचीच वाट पाहूयात. 

Web Title: Exclusive Nagarajan did a video of Aamir's video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.