Exclusive गणेश आचार्य बनवणार भिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 11:13 IST2016-12-08T11:13:15+5:302016-12-08T11:13:15+5:30
बॉलिवूडमधील प्रसिदध कोरिओग्रफर आणि दिग्दर्शक गणेश आचार्य आता मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शीय पदार्पण करीत आहेत. स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी ...
.jpg)
Exclusive गणेश आचार्य बनवणार भिकारी
ब लिवूडमधील प्रसिदध कोरिओग्रफर आणि दिग्दर्शक गणेश आचार्य आता मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शीय पदार्पण करीत आहेत. स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी असे त्यांच्या मराठी चित्रपटाचे नाव आहे. गणेश आचार्य यांनी याआधी काही हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. आता पहिल्यांच ते मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. अनेक वर्षा पासून मित्र असलेले गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रोडक्शन ची स्थापना करून चित्रपट निर्मिती मधे प्रथम पाऊल टाकले आहे.'स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी' हा चित्रपट मोठ्या बिजनेस कुटुंबातील आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर बेतला आहे.अभिनेता स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.'गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटानं स्वत:चा ठसा उमटवला आहे. उत्तम आशय आणि व्यावसायिक यश या दोन्हीचा मिलाफ मराठी चित्रपटांत होत आहे. मराठीत काम करताना सकस आशय ही मराठी चित्रपटांची ताकद असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मला स्वत:ला बरीच वर्षं मराठी चित्रपट दिग्दर्शित करायचा होता. ती इच्छा या चित्रपटाच्या निमित्तानं पूर्ण होत आहे. वेगळं कथानक आणि उत्तम स्टारकास्ट हे चित्रपटाचं वैशिष्ट्यं आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटरसिकांना नक्कीच आवडेल,' असं गणेश आचार्य यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा मुहुर्त करण्यात आला. मुहुतार्वेळी बिग बी आणि टायगर श्रॉफ यांनी गणेश आचार्य यांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.