Exclusive अश्विनी ऐवजी शर्वरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 16:21 IST2016-11-10T14:00:52+5:302016-11-11T16:21:57+5:30
प्रियंका लोंढे अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा तर पसरलीच. अश्विनी या सुयोग आणि झेलू निर्मित तीन ...

Exclusive अश्विनी ऐवजी शर्वरी
< i>प्रियंका लोंढे
अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा तर पसरलीच. अश्विनी या सुयोग आणि झेलू निर्मित तीन पायांची शर्यत या नाटकात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होत्या. या नाटकासाठी त्यांची तयारी देखील सुरु होती. नोव्हेंबरमध्ये नाटक रंगमंचावर येणार असल्याने त्यांना एक फोटोशूट करायचे होते. या फोटोशूटसाठी अश्विनी फारच उत्सुक होत्या. आम्ही जेव्हा सुरुवातीला नाटके करायचो तेव्हा फोटो फक्त जाहिरात आणि परिक्षण लिहिण्यासाठीच काढले जायचे. परंतू आता सोशल मिडियामुळे बराचसा बदल झालेला दिसतोय. वेगवेगळ््या प्रकारे, डिझाईन्समध्ये फोटो आता नाटकांसाठी घेण्यात येतात. असे अश्विनी यांनी संदेशला सांगितले होते. फोटोशूटसाठी मी काही घेऊन येऊ का? असे देखील त्यांनी विचारले होते. मुंबईमध्ये याच नाटकाच्या निमित्ताने अश्विनी, संजय नार्वेकर आणि संदेश यांची भेट झाली होती. संदेश लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना सांगतात, ''एके दिवशी अचानक मला फोन आला अश्विनीला हार्ट अटॅक आल्याचे समजले. मला वाटले ती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाली असेल. पण काही वेळातच समजले कि तिचे निधन झाले आहे. ही बातमी ऐकुन मोठा धक्का बसला होता.'' आता अश्विनी नंतर या नाटकात शर्वरीने काम करावे अशी संदेशची इच्छा होती. म्हणुनच संदेशने विजय केंकरे यांना या नाटकासाठी तुम्ही शर्वरीला विचारता का अशी विनंती केली. केंकरे यांच्या अनेक नाटकांमध्ये शर्वरीने काम केले होते. तसेच शर्वरीला कथा आवडल्याने तिने लगेचच या नाटकात काम करण्यासाठी होकार कळविला. तीन पायांची शर्यत या नाटकात आपल्याला अभिनेता संजय नार्वेकर, लोकेश गुप्ते आणि शर्वरी लोहकरे दिसणार आहेत. नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांचे असणार आहे. या नाटकाचा शुभारंभ १९ नोव्हेंबरला होणार असल्याचे समजतेय.
![]()