घटस्फोटानंतरही सई ताम्हणकरने जपून ठेवलीय पहिल्या लग्नाची ही खास आठवण, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 13:49 IST2024-06-29T13:49:32+5:302024-06-29T13:49:58+5:30
Saie Tamhankar : सध्या सई ताम्हणकर हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात तिच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलताना दिसतेय.

घटस्फोटानंतरही सई ताम्हणकरने जपून ठेवलीय पहिल्या लग्नाची ही खास आठवण, जाणून घ्या याबद्दल
अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) हिने मराठीतच नाही तर हिंदी कलाविश्वात अभिनय कौशल्याच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच ती लवकरच नागराज मंजुळेंच्या मटका किंगमध्ये झळकणार आहे. मात्र सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात तिच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलताना दिसतेय.
सई ताम्हणकरने एका युट्यूब चॅनेलसोबत होम टूरचा व्हिडीओ केला. या व्हिडीओत ती तिच्या घर, कपडे आणि ज्वेलरीबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी तिने तिच्या लग्नातील एका गोष्टीबद्दल सांगितले. तिने तिच्या वॉर्डरॉबमधून एक चुडीदार ड्रेस काढला आणि म्हणाली की, हा ड्रेस माझ्यासाठी खूप खास आहे. हा ड्रेस मी माझ्या लग्नाच्या साडीचा शिवलेला आहे. लग्नातली साडी मला टाकून द्यायची नव्हती. त्यामुळे मी हा चुडीदार ड्रेस शिवून घेतला.
ती पुढे म्हणाली की, भारतातील मोठा फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलेली ही साडी होती. अशा नाजूक साड्या कपाट्यात ठेवून आणि मुंबईतल्या दमट वातावरणात खराब होतात. आता हा ड्रेस मी कितीही वेळा परत घालू शकते. ही साडी खूप स्पेशल आहे.
सईचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही
सई ताम्हणकर हिने निर्माता अमित गोसावीला तीन वर्ष डेट केल्यानंतर लग्न केले. ७ एप्रिल, २०१२ ला अभिनेत्रीने साखरपुडा केला आणि १५ डिसेंबर, २०१२ रोजी लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.