दुष्काळाचे वास्तव दर्शन घडवणारा 'एक होतं पाणी' सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला, या कलाकरांच्या असणार भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:27 AM2018-10-04T11:27:15+5:302018-10-04T11:29:10+5:30

एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. सर्वत्रच दुष्काळाची परिस्थिती भीषण बनत चालली आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे.

EK Hot Paani Marathi Movie Releasing Soon | दुष्काळाचे वास्तव दर्शन घडवणारा 'एक होतं पाणी' सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला, या कलाकरांच्या असणार भूमिका

दुष्काळाचे वास्तव दर्शन घडवणारा 'एक होतं पाणी' सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला, या कलाकरांच्या असणार भूमिका

googlenewsNext

दिवसेंदिवस सिनेमांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. नवनवीन गोष्टींमुळे सिनेमा अधिकाधिक रसिकांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहेत. विशेषतः मराठी सिनेमा प्रगल्भ होत आहे. मराठी सिनेमात निरनिराळ्या गोष्टी दिग्दर्शकांकडून आजमावल्या जात आहेत. त्यामुळं की काय हे सिनेमा रसिकांकडून डोक्यावर घेतले जात आहेत. विविध पुरस्कारांवरही मराठी सिनेमा मोहोर उमटवत आहेत. मराठी सिनेमात विविध विषयाला हात घालण्यात आलाय.आता आणखीन एका  वेगळ्या विषयावर भाष्य करण्यात 
येणारा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे.

सध्या मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घातला जातो आहे. अशाच एका सामाजिक विषयाला हात घालणारा 'एक होतं पाणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. सर्वत्रच दुष्काळाची परिस्थिती भीषण बनत चालली आहे...काही दुष्काळग्रस्त भागात तर दोन वेळचा खाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे. 'न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज' या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मिती होणाऱ्या या सिनेमातील एका गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच पार पडले. कैलास स्टुडिओ येथे पार पडलेल्या या रेकॉर्डिंगला सिनेमाचे दिग्दर्शक रोहन सातघरे, संगीत दिग्दर्शक विकास जोशी यांची उपस्थिती होती. रोहित राऊत, हृषीकेश रानडे तसेच आनंदी जोशी यांच्या आवाजातील गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले. 

विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ हे सिनेमाचे निर्माते आहेत. आशिष निनगुरकर लिखित या सिनेमाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले आहेत. हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत.

Web Title: EK Hot Paani Marathi Movie Releasing Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.