स्वप्निल घेऊन आलाय पडदयामागची गंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:01 IST2016-12-22T16:01:13+5:302016-12-22T16:01:13+5:30

 स्वप्निल जोशी भिकारी नावाचा आगामी मराठी चित्रपट करीत असल्याचे तर सर्वांनाच माहितीय. या चित्रपटातील एका गाण्याचालुक स्वप्निलने नुकताच रिवील ...

The dream of the screen is coming with the dream | स्वप्निल घेऊन आलाय पडदयामागची गंमत

स्वप्निल घेऊन आलाय पडदयामागची गंमत

 
्वप्निल जोशी भिकारी नावाचा आगामी मराठी चित्रपट करीत असल्याचे तर सर्वांनाच माहितीय. या चित्रपटातील एका गाण्याचालुक स्वप्निलने नुकताच रिवील केला होता. देवा हो देवा हे गणपती बाप्पा वरील या चित्रपटातील गाण्याचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. हे गाणे बॉलिवूडचा आघाडीचा गायक सुखविंदर सिंग याने गायले आहे. आता या गाण्याचा एकव्हीडीओ स्वप्निलने नुकताच सोशल साईट्सवर शेअर केला आहे. या व्हीडीओमध्ये आपल्याला शेंदुरी रंगामध्ये गणपती बाप्पाती भली मोठी मुर्ती पाहायला मिळतेय. बाप्पाच्या नावाचा गजर या गाण्यात करण्यात आला आहे. गाण्यातील स्वप्निलचा लुक देखील वेगळा आहे. गाण्याचे चित्रीकरण सुरु असताना पडदयामागची गंमच स्वप्निलने या व्हीडीओत त्याच्या चाहत्यांना दाखविली आहे. नुकताच त्याने हा विहीडीओ सोशल साईट्सवर शेअर केला आहे. खरतर कलाकार त्यांचे लुक्स, चित्रपटातील सीन्स, गाणी, या सर्व गोष्टी अतिशय गोपनीय ठेवतात. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी चित्रपटातील एकही गोष्ट बोहर जाऊ नये याची ते वारंवार काळजी घेतात. परंतू स्वप्निलने मात्र भिकारी या चित्रपटातील सर्वच घडामोडी हळूहळु उलगडायला सुरुवात केली आहे. निळा रंगाचा कुरता, कपाळी चिळा लावलेला स्वप्निल एकदन पारंपारिक वेषात या गाण्यामध्ये आपल्याला दिसणार आहे.  गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रोडक्शन ची स्थापना करून चित्रपट निर्मिती मधे प्रथम पाऊल टाकले आहे. भिकारी हा चित्रपट मोठ्या बिजनेस कुटुंबातील आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर बेतला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: The dream of the screen is coming with the dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.