फोटोतील या गोंडस चिमुरडीला ओळखलंत का?, अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बनलीय महाराष्ट्राची क्रश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 13:33 IST2024-04-03T13:31:25+5:302024-04-03T13:33:58+5:30
मराठमोळ्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

फोटोतील या गोंडस चिमुरडीला ओळखलंत का?, अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बनलीय महाराष्ट्राची क्रश
कलाकार मंडळी अनेकदा सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात. हे फोटो शेअर करत ते त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांचीदेखील खूप पसंती मिळते. दरम्यान आता आणखी एका अभिनेत्रीनं सोशल मीडियावर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule).
अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. मालिका विश्वातून कलाविश्वात तिने पदार्पण केले. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. मालिका, नाटक आणि त्यानंतर सिनेमा अशा माध्यमात तिने आपला ठसा उमटविला आहे. ती महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते. दरम्यान आता तिने इंस्टाग्राम स्टोरीवर बालपणीचा फोटो शेअर केला आहे. ज्यासोबत तिने आताचाही फोटो शेअर केला आहे. बालपणीच्या फोटोत ती खूपच गोंडस दिसते आहे.
अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने माटुंग्यातील रुईया महाविद्यालयातून शिक्षण घेतले. ती अॅडव्हर्टायझिंगमध्ये शिक्षण घेत असताना तिने स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल या मालिकेत इंटर्नशिप केली होती. या मालिकेत ती कॉश्च्युम एडी म्हणून काम शिकत होती. तिची इंटर्नशिप सुरू असतानाच, तिला त्याच मालिकेच्या सेटवर दिग्दर्शक रसिका देवधर यांनी पाहिले आणि तिला दुर्वा मालिकेची ऑफर दिली.अशाप्रकारे तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकेत काम केले. अनन्या, टाइमपास, कन्नी या चित्रपटात ती झळकली.