​तुम्हाला माहीत आहे का ही मराठमोळी अभिनेत्री आहे डॅडी चित्रपटाचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 16:44 IST2017-09-07T10:44:25+5:302017-09-07T16:44:42+5:30

डॅडी या चित्रपटात प्रेक्षकांना अर्जुन रामपाल प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबतच या चित्रपटात ऐश्वर्या राजेश महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार ...

Do you know why this is a part of the Daddy movie Actress Actress | ​तुम्हाला माहीत आहे का ही मराठमोळी अभिनेत्री आहे डॅडी चित्रपटाचा भाग

​तुम्हाला माहीत आहे का ही मराठमोळी अभिनेत्री आहे डॅडी चित्रपटाचा भाग

डी या चित्रपटात प्रेक्षकांना अर्जुन रामपाल प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबतच या चित्रपटात ऐश्वर्या राजेश महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटात आशा गवळीची भूमिका साकारणार आहे. ऐश्वर्या ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचा हा पहिला बॉलिवूडमधील चित्रपट आहे. ऐश्वर्याला हिंदी बोलता येत नसल्याने एका मराठी अभिनेत्रीने तिच्यासाठी डबिंग केले आहे.
डॅडी या चित्रपटात निशिकांत कामत आणि राजेश शृंगारपूरे हे मराठी कलाकार झळकणार आहेत. त्यांच्यासोबतच आणखी एक मराठी कलाकार या चित्रपटाचा भाग असणार आहे. वीणा जामकर या चित्रपटाचा एक हिस्सा आहे. वीणा या चित्रपटात कोणतीही भूमिका साकारली नाहीये तर या चित्रपटात तिने ऐश्वर्यासाठी डबिंग केले आहे. 

Also Read : डॅडीमध्ये पूर्णानंद दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

veena jamkar

अर्जुन रामपाल या चित्रपटात काम करण्यासोबतच या चित्रपटाचा निर्माता देखील आहे. या चित्रपटात ऐश्वर्यासाठी डबिंग करण्यासाठी तो एका चांगल्या अभिनेत्रीच्या शोधात होता. त्यामुळेच त्याने डबिंग करण्यासाठी वीणा जामकरची निवड केली. वीणा जामकरने मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. तिला अभिनयाची खूप चांगली जाण असल्याने तिने डबिंगमध्ये आवाजातील चढ-उतार खूप चांगल्यापद्धतीने केले आहेत. तिच्या या डबिंगच्या प्रेमात अर्जुन रामपालदेखील पडला आहे. त्याने या डबिंगसाठी वीणाचे भरभरून कौतुक केले आहे. वीणा या डबिंगच्या बाबतीत खूपच खूश आहे. ती सांगते, डबिंग करण्यासाठी मला जवळजवळ एक आठवडा लागला. आशा गवळी ही भूमिका खूपच चांगली असल्याने या भूमिकेसाठी डबिंग करणे हे तितकेच आव्हानात्मक होते. पण हे डबिंग करायला खूप मजा आली. माझ्यासाठी डबिंगचा अनुभव खूपच चांगला होता. 
 

Web Title: Do you know why this is a part of the Daddy movie Actress Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.