तुम्हाला माहीत आहे का ही मराठी अभिनेत्री आहे मैं हू ना मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 14:33 IST2016-11-11T16:45:34+5:302016-11-14T14:33:05+5:30
मैं हूँ ना हा चित्रपट आपल्यातील अनेकांनी कित्येक वेळा पाहिला असेल. पण या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री आहे हे ...
.jpg)
तुम्हाला माहीत आहे का ही मराठी अभिनेत्री आहे मैं हू ना मध्ये
म ं हूँ ना हा चित्रपट आपल्यातील अनेकांनी कित्येक वेळा पाहिला असेल. पण या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हो, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये या चित्रपटात होती. शाल्मलीला आणि तिच्या बहीणीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सोनू निगम, ए.आर.रहेमान यांच्यासोबत स्टेज शो केले आहेत. तसेच मैं हू ना या चित्रपटातही ती झळकली आहे. या चित्रपटाच्या आठवणींविषयी शाल्मली सांगते, "या चित्रपटाचे चित्रीकरण दार्जिंलिंगला होते. नोव्हेंबर-डिसेंबरच्या थंडीत आम्ही तिथे चित्रीकरण करत होतो. थंडीत तिथे अंधार लवकर होतो. त्यामुळे संध्याकाळी चारच्या आत पॅकअप व्हायचे आणि चित्रीकरण सकाळी सहालाच सुरू व्हायचे. त्या थंडीत सकाळी चारला आंघोळ करताना आमची अवस्था अतिशय वाईट व्हायची. पाणी कितीही गरम असले तरी ते क्षणात थंड व्हायचे. आम्ही सगळ्या मुली आंघोळ करताना अक्षरशः किंचाळायाचो. फरहा खान सगळ्या टीमची खूप काळजी घेत असे. आमची टीम एखाद्या कुटुंबासारखी होती. दर शुक्रवारी एक ते सव्वा तासाचा एक कार्यक्रम होत असे. त्या कार्यक्रमात आम्ही नाचायचो, नाटक सादर करायचो आणि ते पाहाण्यासाठी फरहा खान, शाहरुख खान, सुश्मिता सेन यायचे. माझे एक नृत्य तर शाहरुखला इतके आवडले की, त्याने स्टेजवर येऊन माझ्या कपाळावर किस केले होते. माझ्या आयुष्यातील हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. फरहा खान तर मला आणि माझ्या एक मैत्रिणीला गिगलिंग गर्ल्स असे म्हणायची. मी कॉलेजमध्ये एकांकिकांमध्ये काम केले असल्याने मला अभिनयाची जाण होती. त्यामुळे अनेक दृश्यात तिने माझ्याकडून अभिनयदेखील करून घेतला आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत मैत्री कोण करणार असे बोमन इराणी विचारतात आणि त्यानंतर अमृता मैत्री करेल असे म्हणत तिच्याकडे बोट दाखवतात असे एक दृश्य आहे. त्या दृश्यात मी अमृताच्या बाजूलाच बसले होते.
![]()
मी सोनू निगम आणि ए.आर.रहमान यांच्यासोबत अनेक वर्षं स्टेज शो केले आहेत. मी सोनूसोबत तर तीन वर्षं स्टेज शो केले. देशात आणि परदेशात मी त्याच्यासोबत दौरे केले. मी सोनू निगमची खूप मोठी फॅन आहे. त्याच्यासोबत काम करायला तर खूप मजा आली. समोर कितीही गर्दी असली तरी त्या गर्दीला कसे सांभाळायचे हे त्याला चांगलेच माहीत आहे. आपल्या टीममधील प्रत्येकाला तो खूप चांगल्याप्रकारे वागवतो. त्याच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. ए.आर.रहेमान यांच्यासारखा तर शांत, प्रेमळ, सगळ्यांचा सन्मान करणारा व्यक्ती मी आजवर पाहिलेला नाही. ते इतके महान असले तरी आजही जमिनीवर आहेत. अशा या महान व्यक्तींसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. मी 2006मध्ये स्टेज शो करणे सोडले आणि मी अभिनयाकडे वळले. त्या काळात मला खूप काही शिकता आले.
आता मी अभिनयात व्यग्र असल्याने मला नृत्याला तितका वेळ देता येत नाही. पण भविष्यात पुन्हा नृत्य शिकण्याची माझी इच्छा आहे.
![Shalmalee tolye with sushmita sen]()
![]()
![]()
![Shalmalee tolye with Amrita Rao]()