Alka Kubal यांनी 'माहेरची साडी' चित्रपटासाठी घेतलं होतं एवढं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 06:24 PM2023-07-14T18:24:15+5:302023-07-14T18:29:45+5:30

माहेरची साडी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती, पण या सिनेमासाठी अलका कुबल यांना किती मानधन मिळालं होतं.

Do you actress alka kubal get this much fees for marathi movie maherchi saree | Alka Kubal यांनी 'माहेरची साडी' चित्रपटासाठी घेतलं होतं एवढं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

Alka Kubal यांनी 'माहेरची साडी' चित्रपटासाठी घेतलं होतं एवढं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

९९१ साली आलेल्या ‘माहेरची साडी’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अलका कुबल (Alka Kubal), उषा नाडकर्णी, अजिंक्य देव, रमेश भाटकर, विजय चव्हाण, विक्रम गोखले अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. आजही अलका कुबल यांचा हा सिनेमा टीव्हीवर लागला की, रिमोट याच चित्रपटाजवळ येऊन थांबतो. सासूकडून होणारा सूनेचा छळ, त्यातून तिचा झालेला दुखद अंत व भाऊ-बहिणीची माया अशी ही कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटात अलका कुबल यांनी सूनेची भूमिका साकारली होती. या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. महिला वर्गाने हा सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला होता. 


माहेरची साडी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. अलका कुबल (Alka Kubal) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आजही तितकाच आवडीने प्रेक्षक पाहतात. या सिनेमामुळे अलका कुबल यांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. अनेकवेळा या सिनेमाचा सीक्वल येणार का अशी चर्चा देखील झाली. पण तुम्हाला माहिती आहे का ३२ वर्षा पूर्वी आलेल्या या चित्रपटात काम करण्यासाठी अलका कुबल यांना किती मानधन मिळालं होतं. 

अलका कुबल यांना या चित्रपटासाठी त्यांचा मिळत असलेल्या मानधनापेक्षा निम्म्याहून मानधन मिळाले होते याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता.  मी मानधनाची किंंमत ऐकून तिथून निघाले होते परंतु त्यावेळी त्यांनीच मी लक्ष्मी साकारावी हे ठरवले होते असं त्या म्हणाल्या होत्या. 

दरम्यान, या सिनेमानंतर अलका कुबल यांचं नशीब चांगलंच पालटलं. या सिनेमानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या. मात्र, त्यांचा माहेरची साडी या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. या सिनेमात त्यांच्यासोबत उषा नाडकर्णी, अजिंक्य देव, रमेश भाटकर, विजय चव्हाण, विक्रम गोखले अशी तगडी स्टारकास्ट झळकली होती.
 

Web Title: Do you actress alka kubal get this much fees for marathi movie maherchi saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.