दिवाळीत आदिती निघाली कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 11:57 IST2016-10-30T11:57:45+5:302016-10-30T11:57:45+5:30

सध्या सगळीकडे प्रत्येकजण दिवाळी साजरा करण्याच्या उत्साहात दिसतो आहे. तर घरापासून दूर राहणाऱ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत थेट आपले घर गाठले ...

Diwali Aditi where? | दिवाळीत आदिती निघाली कुठे?

दिवाळीत आदिती निघाली कुठे?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सध्या सगळीकडे प्रत्येकजण दिवाळी साजरा करण्याच्या उत्साहात दिसतो आहे. तर घरापासून दूर राहणाऱ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत थेट आपले घर गाठले आहे. कलाकार मात्र चित्रिकरणात बिझी असल्याने त्यांनी आपली दिवाळी सेटवर साजरी करावी लागतेय. अभिनेता सिध्दार्थ जाधवने देखील लक्ष्मीपूजनच्या दिवशी गेला उडतचा ७५ वा प्रयोग पार पाडणार  आहे. त्यांने आपली संध्याकाळची वेळ ही  रंगभूमीवर घालवणार आहे. थोडक्यात त्याने आपली यंदाची दिवाळी रंगभूमीवर साजरी करण्याचे ठरविले आहे. आता हेच पाहा ना, अभिनेत्री आदिती पोहनकर ही आपल्या कामात व्यग्र होती. तिनेदखील आपली यंदाची दिवाळी कामात साजरी करण्याचे ठरविले आहे. कारण तिने नुकताच एअरपोर्टवरचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ती सध्या वर्कमूडमध्ये असल्याचे तिने आपल्या स्टेटसमधून सांगितले आहे. तिच्या या स्टेटसवर चाहत्यांनी कुठे निघाली सवारी असा प्रश्न केला आहे. तर दिवाळीच्या शुभेच्छा देखील तिला भरभरून दिल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आदितीच्या या एअर पोर्ट लूकला देखील प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली असल्याचे दिसत आहे. पण आदितीच्या या कामाचा मूड पाहून कलाकार किती व्यग्र असतात हे दिसून येते. आदिती यापूर्वी प्रेक्षकांना लय भारी या चित्रपटातून पाहायला मिळाली होती. तसेच तिने कुणीसाठी कुणीतरी या चित्रपटातदेखील काम केले होते.   त्याचबरोबर आदिती बॉलिवुडमध्येदेखील झळकली आहे. लव्ह, सेक्स और धोका या चित्रपटातदेखील तिने अभिनय केला आहे. पण आदितीची लय भारी या चित्रपटातील भूमिका आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आशा प्रकारे आदितीने बॉलिवुड व मराठी चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण केली आहे. 

Web Title: Diwali Aditi where?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.