बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2016 12:55 PM2016-12-08T12:55:06+5:302016-12-08T12:55:06+5:30

हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा जोर धरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात आले होते. आता यानंतर नुकतेच या चित्रपटाचे सोशलमीडियावर टायटल साँग प्रदर्शित करण्यात आले आहे. दि प्रॉमिस असं या चित्रपटाचं टायटल साँग सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे

Displaying the title song of the film, What Does It Mujra? | बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित

बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित

googlenewsNext
मंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा जोर धरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात आले होते. आता यानंतर नुकतेच या चित्रपटाचे सोशलमीडियावर टायटल साँग प्रदर्शित करण्यात आले आहे. दि प्रॉमिस असं या चित्रपटाचं टायटल साँग सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे.आख्खा प्लॅन रेडी आहे, किल्लाच्या विकासाची आख्खी ब्ल्यु प्रिंट, किल्ल्यावर सहा हजार झाडांची लागवड करायची, हेलिकॉप्टकमधून पर्यटक वरणं किल्ला पाहतील, अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही सांगून ठेवतो... असं प्रेक्षकांचा लाडका कलाकार जितेंद्र जोशी म्हणत आहे. पण व्हिडीयो मध्ये  तुज्या किर्तीच्या कथांना, आम्ही पुसलं कवाचं तुज्या गडाचे दगड, कधी येऊन तू वाच कसे विसरतो रे आम्ही...असे हे अर्थपूर्ण गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहेत आणि सिध्दार्थ महादेवनचा आवाज या गाण्याला लाभला असून अमितराजने संगीत दिले आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण स्वत:ला किंवा एखाद्या व्यक्तिला वचन देतो. असंच वचन या चित्रपटातून देण्यात आलं आहे म्हणजे नावावरुन, टीझरवरुन आणि टीझर पोस्टरवरुन लगेच लक्षात येते की हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणार किंवा त्यांच्या विचारांवर लक्ष केंद्रित करुन सध्याच्या पिढीला मार्गदर्शन करणारा असणार. माज्या राजाला, माज्या शिवबाला मानाचा मुजरा...चला महाराष्ट्राचं वैभव परत आणुया...असं म्हणत नुकतच या सिनेमाचं नवीन टिझर पोस्टर प्रदर्शित केलं आहे. तसेच टिझर पोस्टरसह या चित्रपटाची ३ फेब्रुवारी २०१७ ही प्रदर्शित तारीख पण नुकतीच जाहिर करण्यात आली.एवरेस्ट एंटरटेनमेंट, गणराज प्रॉडक्शन प्रस्तुत, हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात जितेंद्र जोशी, अक्षय टंकसाळे, अनिकेत विश्वासराव या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. 


Web Title: Displaying the title song of the film, What Does It Mujra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.