'असेही एकदा व्हावे' या तारखेला होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 14:08 IST2018-04-04T08:38:00+5:302018-04-04T14:08:00+5:30
झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' हा सिनेमा आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.मराठी रंगभूमी, ...

'असेही एकदा व्हावे' या तारखेला होणार प्रदर्शित
झ लू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' हा सिनेमा आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.मराठी रंगभूमी, मालिका तसेच चित्रपटात विशेष कामगिरीबजावणारे कलाकार उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची यात प्रमुख भूमिका आहे.नात्याच्या भावबंधनाची तरल कथा सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना प्रेमाच्या अनोख्या दुनियेत घेऊन जाणार आहे.अव्यक्तप्रेमाची भावना आणि त्याची जबाबदारी मांडणारा हा सिनेमा प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे करील यात शंका नाही.
'असेही एकदा व्हावे' या सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा नात्यांच्या आशावादी पैलूंवर आधारित असल्याची जाणीव झाल्याखेरीज राहत नाही.उमेश आणि तेजश्रीची लव्ह-केमिस्ट्री मांडणाऱ्या या सिनेमाचीकथा व पटकथा शर्वाणी - सुश्रुत यांनी लिहिली आहे.शिवाय सिनेमाचा विषय योग्यपद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संजय मोने यांच्या उत्कृष्ट संवादलेखनाची साथ त्यांना लाभली आहे.त्याचबरोबरचअवधूत गुप्तेच्या दर्जेदार संगिताची सुरेल मैफिल या सिनेमात अनुभवता येणार आहे. अवधुतने या सिनेमातील एक रोमेंटिक साँग, गजल आणि ठुमरी संगीतबद्ध केली असल्यामुळे, अवधुत गुप्तेचा शास्त्रीयटच त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का ठरेल. आजपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक सिनेमागृहात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, तेजश्री प्रधानचा माॅडर्न लूक ! यात ती एकाआर.जे.च्या भूमिकेतून लोकांसमोर येत असून, उमेशने साकारलेल्या आव्हानात्मक भूमिकेलादेखील तोड नाही.मधुकर रहाणे या सिनेमाचे निर्माते असून, त्यांना रवींद्र शिंगणे यांची बहुमूल्य साथ लाभलीआहे.सुट्टीत प्रदर्शित झालेला हा सिनेमा संपूर्ण कुटुंबासमवेत पाहता येईल असा आहे.