"कोणी कपडे पळवले तर कोणी चपल्या चोरल्या..", 'नटरंग'च्या शूटिंगदरम्यान रवी जाधव यांना आला होता वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:03 AM2023-10-18T11:03:38+5:302023-10-18T11:06:25+5:30

मराठीबरोबरच रवी जाधव यांनी हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा ठसा उमटवला.

Director ravi jadhav share experience about their movie natarang | "कोणी कपडे पळवले तर कोणी चपल्या चोरल्या..", 'नटरंग'च्या शूटिंगदरम्यान रवी जाधव यांना आला होता वाईट अनुभव

"कोणी कपडे पळवले तर कोणी चपल्या चोरल्या..", 'नटरंग'च्या शूटिंगदरम्यान रवी जाधव यांना आला होता वाईट अनुभव

मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव चर्चेत आहेत. टाइमपास, बालक पालक, नटरंग, बालगंधर्व असे अनेक हिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले. मराठीबरोबरच रवी जाधव यांनी हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा ठसा उमटवला. अलिकडेच प्रदर्शित झालेली त्यांची ताली ही वेब सीरिज लोकप्रिय ठरली. अलिकडेच रवी जाधव सारेगमप लिटिल चॅम्पच्या मंचावर आले होते. यावेळी त्यांनी त्यांचा हिट सिनेमा नटरंगबाबत खुलासा केला.  

नटरंग या चित्रपटाची कल्पना नक्की रवी जाधव यांना कशी सुचली याचा उलगडा त्यांच्या मोठ्या भावाने केला आहे. ते म्हणाले, नटरंग नावाची कादंबरी वाचताना रवीला म्हटलं की यावर सिनेमा बनवूया. रवीने घरी घेऊन बाबांना सांगितलं की मी उद्यापासून नोकरी सोडतोय. बाबांनी त्याला कारण विचारलं तर म्हणाला मला चित्रपट बनवायचा आहे. बाबांनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तर नव्हता. लाख रुपयांची नोकरी सोडून त्याने शूटिंगला सुरुवात केली. शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून अनेक अडचणी आल्या. कपडे आणले ते लोक घेऊन पळून गेला. चपल्या आणल्या त्याही पळवून नेल्या. मात्र तरीही त्याने हार मानली नाही. चित्रपट पूर्ण केला.' 

नटरंग चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना रवी म्हणाले, मला इतकंच आठवतंय की, नटरंग चित्रपटातील गाणी चालायला लागली तेव्हा मला पहिली प्रतिक्रिया राजूकडून(मोठा भाऊ) आली होती. कॉलेजला जाणारी मुलं रिक्षामध्ये गाणी ऐकायची तेव्हा मला तो सांगायचा की तुझं गाणं खूप चांगलं चालेल आणि कारण लोक ते पुन्हा ऐकतात.' 

Web Title: Director ravi jadhav share experience about their movie natarang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.