दिल में बजी गिटार...!! सईच्या अदांवर चाहते घायाळ, ठसकेबाज डान्सचा व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 02:55 PM2024-01-24T14:55:38+5:302024-01-24T14:56:12+5:30

Saie Tamhankar : सईने सोशल मीडियावर या चित्रपटातील दिल में बजी गिटार या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Dil Mein Baji Guitar...!! Sai's Adawar fans are injured, Thashkebaaz dance video is in discussion | दिल में बजी गिटार...!! सईच्या अदांवर चाहते घायाळ, ठसकेबाज डान्सचा व्हिडीओ चर्चेत

दिल में बजी गिटार...!! सईच्या अदांवर चाहते घायाळ, ठसकेबाज डान्सचा व्हिडीओ चर्चेत

सई ताम्हणकर (Sai Tamhankar) बोल्ड, बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सईने फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपली छाप उमटविली आहे. ती लवकरच श्रीदेवी प्रसन्न या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान आता सईने सोशल मीडियावर या चित्रपटातील दिल में बजी गिटार या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

सई ताम्हणकर हिने इंस्टाग्रामवर दिल में बजी गिटार या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि इतरांनाही त्यावर रील बनवायला सांगितला आहे. या व्हिडीओत सईने पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसली आहे. त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला आहे. तिने मराठमोळा लूक पूर्ण करण्यासाठी नाकात नथ घातली आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत. या गाण्यावर सईने खूप दमदार डान्स केला आहे. याशिवाय ती लेझिम घेऊन थिरकताना दिसत आहे.

सई ताम्हणकर या डान्स व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' मधील दिल में बजी गिटार या गाण्याला काही वेळातच हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच श्रेयस तळपदेचं सरप्राईज चाहत्यांच्या पसंतीस पडलं आहे. गाण्यात श्रेयसच भाव खाऊन गेला आहे अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत.  या सिनेमाच्या माध्यमातून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझर आणि ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Web Title: Dil Mein Baji Guitar...!! Sai's Adawar fans are injured, Thashkebaaz dance video is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.