दिल दोस्ती दुनियादारी फेम अमेय वाघ अडकला लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 14:06 IST2017-07-03T08:35:28+5:302017-07-03T14:06:40+5:30

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता अमेय वाघ नुकताच लग्नबंधनात अडकला. त्याने त्याची मैत्रीण साजिरी देशपांडेसोबत पुण्यात ...

Dil Dosti Dostiadhi Fame Amey Tiger Adkalan | दिल दोस्ती दुनियादारी फेम अमेय वाघ अडकला लग्नबंधनात

दिल दोस्ती दुनियादारी फेम अमेय वाघ अडकला लग्नबंधनात

ल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता अमेय वाघ नुकताच लग्नबंधनात अडकला. त्याने त्याची मैत्रीण साजिरी देशपांडेसोबत पुण्यात विवाह केला. त्यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली. पुण्याच्या श्रुतिमंगल सभागृहात त्यांनी लग्न केले. 
साजिरी आणि अमेय एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. गेल्या 13 वर्षांपासून ती त्याची खूप चांगली मैत्रीण आहे. अमेयने आज मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे चांगले नाव कमावले आहे. पण त्याची जोडीदार या क्षेत्रातली नाहीये. साजिरी कोलगेट कंपनीत काम करते. 
अमेयनेच त्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरून त्याच्या फॅन्सना दिली होती. पुढील 11 दिवसांत मी लग्न करणार आहे असे त्याने काही दिवसांपूर्वी फेसबुकवरून त्याच्या फॅन्सना सांगितले होते. त्याने फेसबुकला त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करून त्यासोबत एक छानशी पोस्ट लिहिली होती. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ती मला 13 वर्षांपासून सहन करत आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही आणि तरीही ती आयुष्यभर माझ्यासोबत खूश राहाण्याची आशा करत आहे. किती ब्रेव्ह मुलगी आहे ना ही... तिला आशीर्वाद द्या आणि माझे अभिनंदन करा. त्याचसोबत त्याने वाघाची झाली शेळी असा हॅशटॅग देखील या पोस्टसोबत दिला होता.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, सुमित राघवन, ललित प्रभाकर, जितेंद्र जोशी अमेयच्या लग्नाला उपस्थित होते. याबरोबरच 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतील संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती. अमेय आणि साजिरीला आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी यावेळी सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
अमेय आणि साजिरी यांच्या लग्नानंतर त्यांच्या फॅन्सनी इन्स्टाग्रामवर त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओत अमेय वाघ फेटा बांधून मंगल कार्यालयात येताना दिसतोय. अमेय हॉलमध्ये येताच वऱ्हाडी मंडळी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करत एकच जल्लोष करताना आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे. 

Also Read : अमेय वाघ 'हि'च्यासोबत अडकणार लग्नबंधनात

Web Title: Dil Dosti Dostiadhi Fame Amey Tiger Adkalan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.