अभिनेता स्वप्नील जोशीच्या पत्नीला पाहिलंत का ?, लाइमलाइटपासून राहते दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 06:00 IST2021-08-04T06:00:00+5:302021-08-04T06:00:00+5:30
स्वप्नील जोशीचे लग्न जमण्यापासून लग्न होईपर्यंतची संपूर्ण स्टोरी ही एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी आहे.

अभिनेता स्वप्नील जोशीच्या पत्नीला पाहिलंत का ?, लाइमलाइटपासून राहते दूर
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीने विविध भूमिका सक्षमपणे साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. स्वप्नील सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. बऱ्याचदा तो सोशल मीडियावर फॅमिलीचे फोटो शेअर करत असतो. स्वप्नील जोशी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असला तरी त्याची पत्नी लीना हिचा सिनेइंडस्ट्रीशी काहीही संबध नाही. ती लाइमलाइटपासून दूर राहते. ती डेंटिस्ट आहे.
स्वप्नील जोशी आणि त्याची पत्नी लीना आराध्ये यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. हे अरेंज मॅरेज आहे. पण त्यांचे लग्न जमण्यापासून लग्न होईपर्यंतची संपूर्ण स्टोरी ही एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी आहे. स्वप्नीलचे लीनासोबतचे हे दुसरे लग्न आहे.
अकरावीत असताना स्वप्नील जोशी आणि त्याची पहिली पत्नी अपर्णाचे सूत जुळले होते. मग त्यांनी लग्नही केले. मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या फक्त चार वर्षांतच स्वप्नील आणि अपर्णा वेगळे झाले. २००९ मध्ये स्वप्नील आणि अपर्णाने घटस्फोट घेतला.
स्वप्नील आणि लीना पहिल्यांदा मुंबईतील एका कॉफी शॉपमध्ये भेटले होते. या दोघांचा पाहण्याचा कार्यक्रम होता. त्या दिवशी स्वप्नील शूटिंग करत होता आणि पॅकअप रात्री साडेअकरा वाजता झाले. शूटिंग संपवून स्वप्नील लेट नाईट लीनाला भेटायला कॉफी शॉपमध्ये आला. एक मुलगी आपली वाट बघत एवढ्या रात्रीपर्यंत थांबली यावरुनच तो इम्प्रेस झाला.
पहिल्याच भेटीत त्यांचे सूर जुळले आणि २०११ मध्ये स्वप्नील आणि लीना लग्नबेडीत अडकले. आता त्यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव मायरा तर मुलाचे नाव राघव आहे.
स्वप्नील बऱ्याचदा मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.